देशी भट्टीत क्षुल्लक कारणा वरून मित्राने केली मित्राची हत्या
हत्ये नंतर ही दारूभट्टी सुरूच पोलिसांच्या भूमिकेने असंतोष
🖋️साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्गूस : शहराच्या मध्यभागी असलेल्या दीक्षित देशी भट्टीत एका मित्राने सर्वां समक्ष अर्धा तास भीषण मारहाण करून मित्राची हत्या केली.
अर्धा तास दारुभट्टीचे कर्मचारी व्यवस्थापक व उपस्थित दारुडे हे फक्त बघ्याची भूमिकेत होते
यानंतर तपासासाठी आलेल्या पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या दारुभट्टीला बंद करण्याची ही तसदी घेतली नाही पोलीस पुढे तर दारुडे मागे – मागे असा लज्जास्पद दृश्य शहरात दिसून आले याघटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे
शहरातील दीक्षित देशीभट्टीत इंदिरा नगर निवासी सूरज उर्फ मोनू जैस्वाल हा आपला मित्र शास्त्री नगर निवासी दिलीप कुंटावार सह सांयकाळी 07 वाजताच्या सुमारास दारू पिण्यासाठी आले होते यावेळी 1500 रुपयांच्या देवाणघेवाणीला घेऊन वाद शुरु झाला पाहता – पाहता वाद विकोपाला जाऊन मारहाणीस सुरुवात झाली सूरज हा जमिनीवर पडला असता त्याला दवाखान्यात नेण्यात आले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती कळताच ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी
तातळीने घटनास्थळी पोहचून चौकशीला सुरुवात केली
सीसीटीव्हीची तपासणी केली
पोलीस अधीक्षकांनी ही पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली
व शांती व सुव्यवस्थेचा आढावा घेतला शहरातील मुख्य चौकात झालेल्या घटनेने पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे