कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक.

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक.

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक.

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक.

✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८ 📞

माणगाव : लोकसभेच्या निवडणुका बरोबरच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
15 मे 2024 ला निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल.त्या नंतर 22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
27 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. व 10 जून ला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे,आणि 13 जुन 2024 ला मतमोजणी करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

कोकण पदवीधर मतदार संघाची रचना पहिली तर
ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे त्यात समाविष्ट होतात,
1 जानेवारी 2024 च्या अंतिम मतदार यादी नुसार
एकुण 1,77,032 मतदार आहेत,
अजूनही 12 मे पर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, त्यामुळे यंदा ही संख्या 2 लाख पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

या निवडणुकीसाठी पात्र पदवीधर मतदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे,तसेच मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचा पदवीधर आवश्यक आहे,
मतदार नोंदणी करताना नमुना नंबर 18 भरणे आवश्यक आहे,सोबत पासपोर्ट साईज 1 रंगीत फोटो,पदवी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र ,आधारकार्ड, मतदान कार्ड,लाईट बिल,
तसेच नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी, पॅनकार्ड,आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.सर्व झेरॉक्स वर आपली सही आवश्यक आहे,(नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर 2020 पर्यंत पदवीधर झालेला असावा) त्या नंतर चे पदवीधर भाग घेऊ शकणार नाहीत.

मागील 2018 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्री. संजय मोरे, राष्ट्रवादी चे श्री नजीब मुल्ला, भाजप चे श्री. ॲड. निरंजन डावखरे हे प्रामुख्याने उमेदवार होते, त्यापैकी श्री,निरंजन डावखरे हे विजयी झाले होते.

आपल्याकडे एक म्हण आहे, *नाव सोनुबाई आणि हाती कथळाचा वाळा*
नाव *कोकण पदवीधर मतदार संघ* आणि त्याची रचना पहिली तर ठाणे, पालघर हे मुंबई जवळील जिल्हे त्यात येतात. आणि निम्म्यापेक्षा जास्त मतदार नोंदणी या दोन जिल्ह्यातून होते, त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातून प्रतिनिधी कधीही निवडून येऊ शकत नाही. त्या मुळे या निवडणुकीत कोकणी माणूस रसच घेत नाही.
खरे तर आपल्या भागातील आमदार, खासदार,पालकमंत्री यांनी ही बाब लक्षात घेऊन या रचनेत बदल केला पाहिजे, ठाणे,पालघर वगैरे साठी वेगळा पदवीधर मतदारसंघ निर्माण केला पाहिजे .
परंतु त्यांना या कडे कधीही लक्ष द्यावेसे वाटतच नाही, आज तागायत या लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने पहिलेच नाही.
कोकणात शिक्षण घेऊन पदवीधर झालेले नोकरी धंद्यासाठी मुंबई,पुणे येथे जाण्याशिवाय पर्याय नसतो.कारण स्थानिक ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत.
मग प्रश्न पडतो की,
*कोकण पदवीधर मतदार संघ* ची गरजच काय ? आज पर्यंत या माध्यमातून कोकणी माणसाचा काय फायदा झाला?
मग कोकणातील पदवीधारकांच्या हाती कायमच येतो तो कथळाचा वाळा !

यावर आता एकच उपाय म्हणजे यंदाच्या *कोकण पदवीधर मतदार संघ* निवडणुकीवर बहिष्कार टाकणे,
कोकणी पदवीधर मतदार राजा आता तरी जागा हो.
आणि पुढील पिढीतील पदवीधारकांना न्याय मिळवून दे!
~सौ निता सुभाष शेठ
महाड,रायगड.