तला तालुक्यातील बोरीचा माल येथे देवी लक्ष्मी नारायण मंदिराचा वार्षिक महोत्सव आणि महापूजा उत्सहात साजरा….
✍️-सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
कोकण :-परमपूज्य जगतगुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपा आशीर्वादाने तला तालुक्यातील बोरीचा माल येथे देवी लक्ष्मी नारायण मंदिराचा वार्षिक महोत्सव व महापूजा मोठया उत्सहात साजरी करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ तसेच आजू बाजूच्या लोकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.देवी लक्ष्मी मंदिराच्या महोत्सव मध्ये सलग तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बुधवारी दुपारी कालिकामाताची मूर्ती मंदिरापासून गायमुख पर्यत मिरवणूक काढून तिथे मूर्तिचे स्नान करून परत मंदिरापर्यत आणले व धान्याचा अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा केली तर गुरुवारी सकाळी पाच वाजल्यापासून महाआरती कासव स्थापना, गजेंद्र हत्ती स्थापना,नंदी स्थापना, गोमाता स्थापना,वृदावन स्थापना,महाप्रसाद, हळदी कुंकू,असे अनेक कार्यक्रम करण्यात आले.
देवी लक्ष्मी नारायण मंदिराचे संस्थापक मा. श्री. तुकाराम रामकृष्ण काते माजी आमदार व अँड.जयदीप महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुक्रवार दि.10 मे अक्षय तृतीया दिवशी पहाटे महाआरती देवी लक्ष्मी नारायण दत्त भगवान शंकर भगवान यांच्यावर अभिषेक तर कालीमाता मूर्ती स्थापना प्रारभ श्री. संदीप चटर्जी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्याच प्रमाणे सत्यनारायण महापूजा देवी लक्ष्मी नारायण देवींची पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली काली मातेची चौकी व मान्य वराचा सत्कार सोहळा यावेळी मोठया उत्सहात व आनंदात पार पडला….