ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा ७० वा जन्मदिवस ” स्वाभिमान दिवस ” म्हणून साजरा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा ७० वा जन्मदिवस " स्वाभिमान दिवस " म्हणून साजरा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा ७० वा जन्मदिवस ” स्वाभिमान दिवस ” म्हणून साजरा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा ७० वा जन्मदिवस " स्वाभिमान दिवस " म्हणून साजरा

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

भंडारा : ( लाखनी ) भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा ७० वा जन्मदिवस दिनांक १० में २०२४ रोजी स्वाभिमान दिवस म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

त्या अनुषंगाने दुपारी १.०० वाजता लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लाखनी तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे, महिला आघाडीचे लाखनी तालुका महासचिव चेतना मेश्राम, युवा तालुकाध्यक्ष नेहाल कांबळे, मंगेश गेडाम, सिद्धार्थ मेश्राम, रवींद्र मेश्राम, लोकशाहीर अंबादास नागदेवे , विवेक मेश्राम, अशोक गजभिये, व रक्षानंद नंदागवळी यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी लाखनी तालुकाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन आघाडी सदैव प्रयत्नशील आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी व समतेचे राज्य निर्मितीसाठी बहुसंख्य जनतेने वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करावे. असे प्रतिपादन करून आवाहन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन खोब्रागडे यांनी केले. तर आभार आशिष खोब्रागडे यांनी मानले. हे खास