गौरक्षक हल्ला? दामत-नेरळ गावात शांततेचे आवाहन
चोख पोलीस बंदोबस्त
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ: दिनांक ११ में रोजी सकाळी ५ वजता नेरळ पोलीस ठाणे येथे गौरक्षक नेरळ यांनी येवून कळविले की, दामात येथे गोवंशीय जनावराची कत्तल सुरू आहे तरी आपण छापा टाकुन कारवाई करा. त्या अनुषंगाने खातरजमा करण्यासाठी नेरळ पोलीस टीम दाखल झाली होती, त्यांच्या पाठोपाठ गौरक्षक देखील दामात गावात गेले होते. त्यावेळी दामात गावातील स्तानिक गावकरी व गौरक्षक यांचेमध्ये बाचाबाची होवून वाद निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी सतर्कता दाखवत वाद शांत केला व दुपारी १२.१५ दरम्यान दामात गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांची उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर विभाग अति.कार्यभार कर्जत विभाग यांचे अध्यक्षतेखाली प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व दामात गावाचे जाबीर नजे (सरपंच), सरफराज नजे, जलील नजे, सरफराज टिवाळे, अजगर खोत, साजीद नजे, शादाब नजे यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. उपस्थित प्रतिष्ठीत नागरीक यांना विक्रम कदम यांनी गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करत असाल तर असे अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या सुचना दिल्या.
प्रतिष्ठीत नागरीकानी ठराव घेतो व यापुढे गावात जनावरांची अवैध कत्तल होणार नाही असे अश्वासन दिले. तसेच संध्याकाळी गौरक्षक व हिंदू समाजतील प्रतिष्ठीत नागरीक वकील दीपक गायकवाड, ओमकार भडसावळे, विशाल साळुंखे व इतर यांची बैठक घेण्यात आली. त्याचप्रमाणे सदर घटनेचे अनुषंगाने गावात शांतता राखण्याची उपस्थितांना समज देण्यात आलेली असून दामात गावात व नेरळ कुंभारआळी येथील धार्मिक स्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात येत असून अफवांवर विश्वास ठेऊ नये.