आमदार महानाट्य करंडक स्पर्धेत दि १३ मे रोजी चिंगी नाट्यप्रयोग

आमदार महानाट्य करंडक स्पर्धेत दि १३ मे रोजी चिंगी नाट्यप्रयोग

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- आमदार महानाट्य करंडक स्पर्धा २०२५ विदार्थ सौख्य सागर सांस्कृतिक कला मंच पेझारी प्रस्तुत दोन अंकी नाटक, अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावर आधारित दोन अंकी नाट्यप्रयोग “चिंगी” नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रकाश पाटील पेझारी, निर्मात्या सुनीता पाटील, नेपथ्य सागर पाटील, पार्श्वसंगित नितीन पाटील, प्रकाश योजना जगदीश धळे, विवेक पाटील, रंगभूषा तेजश्री पाटील तसेच नाट्यप्रयोगातील सर्व कलावंत प्रकाश पाटील, तुषार पाटील, नंदकुमार पाटील, जितेंद्र काकडे, विजय पाटील, सुरज अहिरे, महेंद्र म्हात्रे, कुमारी जानवी, कुमारी माने हर्षदी जाधव कुमारी तनिष्का पाटील कुमारी श्रावणी सुतार हे आहेत.
महत्वाचे म्हणजे चिंगी हा नाट्यप्रयोग अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित असून आजच्या विज्ञान युगात अन् स्पर्धेच्या जगात जीवनाचा प्रवास अधिकच गतिमान झाला आहे. आपला देश महासत्ताक बनण्याच्या मार्गावर आहे ही अभिमानाची गोष्ट आहे तसेच विज्ञान युगात शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी मोठी प्रगती केली आहे हे कौतुकास्पद आहे. मात्र तरीही अज्ञान व अंधश्रद्धेमुळे आज सामान्य गरीब श्रीमंत शिकलेला माणूस आज अंधश्रद्धेमध्ये गुरफटला आहे. भूत पिशाच्च, करणी अशा मध्ये अडकलेला दिसत आहे. याचा फायदा भोंदू साधू बाबा महाराज घेत आहेत. आजही विज्ञान युगात प्रगतीच्या जगात सर्व सामान्य श्रीमंत शिकले सवरलेला माणूस आपल्या घरात आजारी पडल्यानंतर अंधश्रद्धेत अडकून उपचारासाठी डॉक्टरांकडे न नेता भगत, बुवा, बाबा महाराज यांच्याकडे गुण विभूती घेण्यासाठी जातात आणि स्वतःचं नुकसान करतात. अज्ञान व अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच ढोंगी साधू महाराज अंधश्रद्धेचा फायदा घेऊन महिलांचा चारित्र्य पवित्र भंग करू पाहतात तसेच अत्याचार केले जातात हे थांबणे काळाची गरज आहे. म्हणूनच आज अंधश्रद्धेमुळे माणूस फसला असून अंधश्रद्धेतून तो बाहेर यावा त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत हाच उद्देश व ध्येय नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रकाश पाटील यांनी नाट्य लेखनात केले आहे. गेल्या अनेक वर्षात सदरचं नाट्य प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहे. विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे तसेच सदर नाट्यप्रयोग सर्वांनी पहावा अशी सर्व प्रेक्षकांना त्यांनी विनंती केली आहे.
महत्वाचे म्हणजे आमदार महानाट्य करंडक स्पर्धा भरून अलिबाग तालुक्यातील विविध नाट्य मंडळांना व ग्रामीण कलावंतांना आमदार महेंद्र दळवी यांनी व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल सर्व कलावंता तर्फे आमदार महेंद्र दळवी यांचे आयोजकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.