रा.जि.प.मध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या बदल्या करा.
संजय सावंत यांची मागणी.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या एकाच विभागात एकाच टेबलवर पाचवर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांच्या बदल्या जिल्हा परिषद प्रशासनाने कराव्यात अषी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिशद यांना पत्र पाठवून केली आहे. पदाधिकारी, राजकीय नेते मंडळी, सदस्य आणि काही अधिकारी यांच्या मर्जीतील कर्मचारी यांचे टेबलच गेली तीन वर्ष बदललेले नाहीत तसेच काही कर्मचारी एकाच विभागात पाच वर्षे पेक्षा अधिक काळ कार्यरत असल्याने त्यांचे तेथे हितसंबध निर्माण झाले असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
याबाबत सावंत यांनी जिल्हा परिशदेकडे माहिती अधिकारान्वये अर्ज करून रायगड जिल्हा परिषदेमधील कर्मचा-यांच्या करण्यांत आलेल्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश तसेच शासन ग्रामविकास विभागाकडील निर्णय दि. 15 मे 2014 अन्वये कर्मचा-यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त 3 वर्षे व एका विभागात जास्तीत जास्त 5 वर्षे काम करता येईल त्यानंतर त्यांचे त्यांची बदली करावी असे निर्देश आहेत. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये एकाच विभागात 5 वर्षे झालेल्या व एकाच टेबलावर 3 वर्षे झालेल्या कर्मचा-यांची त्यांच्या कालावधीसह तसेच प्रतिनियुक्तीवर आपल्या मुळ विभाग सोडून इतर विभागात काम करणा-या कर्मचा-यांची त्यांच्या कालावधीसही माहिती मिळावी अषी मागणी केली आहे.
दि.१५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार १० वर्ष एका तालुक्यात वास्तव्य करणारे कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र असतात. परंतु विधवा,कुमारिका,अपंग,५३ वर्षावरील कर्मचा-यांना यातून सूट दिली जाते ७ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार एका तालुक्यात ३ वर्ष सेवा झालेले कर्मचारी विनंती बदलीस पात्र ठरतात.यामध्येही अपंग,विधवा,पती पत्नी इत्यादींना प्राधान्यक्रम दिला जातो.
नव्यानेच रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप नेहा भोसले यांनी 11 मे रोजी परिपत्रक काढून प्रकल्प संचालक, रायगड जिल्हा परिषद अलिबाग.,खाते प्रमुख–रायगड जिल्हा परिषद अलिबाग (सर्व) गट विकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांना पत्र लिहून जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणाची अमलबजावणी, २०२० सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) व कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) (प्रशासकीय बदली) संदर्भात वेळापत्रक कळविण्यांत आले आहे. वरिल संवर्गातीच्या प्रशाकीय बदल्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर प्रशाकीय बदल्यांची यांद्यावर दिनांक ०४.०५.२०२५ पर्यत हरकती/आक्षेप/सुचना मागविण्यात आलेल्या होत्या त्यानुसार ज्या हरकती/आक्षेप/सुचना मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार सदर यादीमध्ये बदल करून वरिल संवर्गाची अंतिम सेवा जेष्ठता यादी या पत्रासोबत जोडून देण्यात येत आहे.तरी सदर यादी संबंधित कर्मचारी यांचे निदर्शनास आणून द्यावी. सदर बदलीचे समुदेशनाचे वेळपत्रक आपणास कळविण्यात आले असून सोबत जेष्ठता यादी असून या यादीमध्ये 12 वर्षाच्या वर एका तालुक्यात कालावधी झालेल्या काही कर्मचा-यांना सुट देण्यांत आली आहे. परंतु ती सुट का देण्यांत आली, कोणत्या नियमाव्दारेदेण्यात आली याबाबत कोणताही खुलासा नसल्याचा आरोप सावंत यांनी राजिपचच्याच पत्राच्या आधार केला आहे. सीईओंनी यांचे स्पष्टीकरण दयावे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. कारण नुकत्याच उजेडात आलेल्या साडेपाच कोटीच्या वेतन फरकाच्या अपहारातील महेश गोपीनाथ मांडवकर या कर्मचा-याला एकाच तालुक्यात 9 वर्षांच्या वर एका टेबलवर ठेवल्याने त्याने मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.
संबधीत प्रकरणाची सविस्तर माहिती सीईओंनी जनतेच्या माहितीसाठी प्रसिध्द करावी, कर्मचा-यांसोबत व्यक्तीगत मतभेद असण्याची शक्यता नाही परंतु कर्मचा-यांनीही दहा बारा वर्षे एकाच तालुक्यात काम करून कायदयाची मोडतोड करून नये एवढीच माफक अपेक्षा असल्याची प्रतिक्रीया सावंत यांनी दिली आहे.