धक्कादायक! पतीची हत्या करुन पत्नीचा गाठला क्रूरतेचा कळस, गुप्तांग कापून तेलात तळलं.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
मुंबई,दि.12 जून:- नवरा बायको मध्ये वाद हे काही नविन नसते, हे वाद कमी जास्त प्रमाणात प्रत्येक घरी असते. मात्र, अनेकदा भांडण इतकं वाढतं की ते थेट घटस्फोटापर्यंत जातं. अनेक प्रकरणं अशीही पाहायला मिळतात की या भांडणातून हत्याही झाली आहे. मात्र, आता समोर आलेलं एक प्रकरण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमध्ये महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आहे. इतकंच नाही तर यानंतर तिनं आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापून तेलात टाकत तळला असल्याचा आरोप तिच्यावर आहे.
ही खळबळजनक घटना ब्राझीलमधून असून क्रिस्टिना रोड्रिगेज मशाडो असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीत काही थक्क करणारे खुलासे झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टिना साओ गोनकालोमध्ये आपल्या पतीसोबत राहात होती. दोघांमध्ये सतत वाद होत असत. पोलिसांनी जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र याठिकाणी त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आंद्रेचा प्रायव्हेट पार्ट पॅनमध्ये सोयाबीन तेलात तळण्यात आला होता.