राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व मास्क चे वितरण.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा 12 जुन:- ओबीसी चळवळीचे व विदर्भ विकासासाठी झटनारे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी व्यतीमत्व म्हणून ओडखल्या जाणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक अशोक जिवतोडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील उपजिल्हा रूग्णालयातिल रुग्णाना व झोपडपट्टितील नागरिकांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका राजुरा च्या वतीने फळ व मास्क चे वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष डेरकर, महासचिव बादल बेले, कार्याध्यक्ष कपील ईद्दे, नागेश उरकुडे, डी.आर.गौरकर, छोटूलाल सोमलकर, संदीप आदे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी संघाचे अध्यक्ष किसन बावण, सचिव सुभाष अडवे, उपाध्यक्ष साईनाथ परसुटकर, डॉ. लहू कूळमेथे, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. अशोक जाधव आदींची उपस्थिति होती.