भिवंडीत मैला ड्रेनेज लाईनचे कामात हलगर्जी पणा, मनपा प्रशासन झोपेत.

54

भिवंडीत मैला ड्रेनेज लाईनचे कामात हलगर्जी पणा, मनपा प्रशासन झोपेत.

भिवंडीत मैला ड्रेनेज लाईनचे कामात हलगर्जी पणा, मनपा प्रशासन झोपेत.
भिवंडीत मैला ड्रेनेज लाईनचे कामात हलगर्जी पणा, मनपा प्रशासन झोपेत.

✒अभिजीत सकपाळ, भिवंडी प्रतिनिधी✒
मुंबई/भिवंडी,दि.12 जुन:- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ईगल कंपनी या कंपनीच्या मार्फत चालू असलेल्या मैला ड्रेनेज लाईनचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु काही दिवसांपूर्वी मेन रोड मंडई ते कोटरगेट मस्जिद समोरी रोडच्या बाजूला काम झाले असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सिमेंट अथवा डांबरीकरण करण्यात आले नसून एक मिनिडोर गाडी जात असताना खड्यात टायर अडकून एक मोठा अपघात टळला तसेच कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही आजू बाजूच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन मिनिडोर गाडी उचलून बाजूला करण्यात आली. त्यामुळे ईगळ कंपनी यांचे किती हलगर्जीपणाने चालू आहे. असे सिद्ध होते.

मैला ड्रेनेज लाईनचे काम मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा सुरु असुन महानगर पालिका प्रशासन आणि अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्यामुळे आम जनतेला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर महानगर पालिका प्रशासनाने लवकर लक्ष दयावे अशी मागणी जोर धरत आहे.