मुलीला दिली जीवेमाराची धमकी आणि तिच्या आईच लावल जबरदस्तीने लग्न…

✒️सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधि✒️
जालना:- जालना जिल्हातुन एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेचं काही वर्षांपूर्वी वडगाव शेरी (पुणे) येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकाशी लग्न झाले होते. काही दिवसात पतीच्या दारुच्या व्यसनामुळे पतीसोबत खटके उडू लागले. त्यामुळे तिने आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगीही झाली होती. पीडित महिला आपल्या मुलीसोबत एकटी पुण्यात राहात होती.
जालना जिल्हातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असणाऱ्या गोपाळ प्रकाश शिरसाट याने संबंधित महिलेला बळजबरी गावी आणले. याठिकाणी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत पीडितेचे अमोल शिरसाट नावाच्या व्यक्ती सोबत जबरदस्तीने लग्न लावू दिले. या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेने पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर हे प्रकरण पारध पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.