नागपुर भिषण कार अपघात, कारचे झाले दोन तुकडे, तिन महीलाचा जागीच मृत्यु.

61

नागपुर भिषण कार अपघात, कारचे झाले दोन तुकडे, तिन महीलाचा जागीच मृत्यु.

नागपुर भिषण कार अपघात, कारचे झाले दोन तुकडे, तिन महीलाचा जागीच मृत्यु.
नागपुर भिषण कार अपघात, कारचे झाले दोन तुकडे, तिन महीलाचा जागीच मृत्यु.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.12 जुन :- सविस्तर वृत्त असे की, एक भीषण कार अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कार अनियंत्रित होऊन कार छोट्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. यात कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले असून, कारमधील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक व एक महिला गंभीर जखमी झाली आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण त्यांची परिस्थिती खुप गंभीर असल्याची माहिती मिडिया वार्ता न्युज ला मिळाली आहे.

या भीषण कार अपघातातील मृतांमधील एक महिला नागपुर जिल्हातील कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 547 वरील सौंसर जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश जवळ शुक्रवारी दि 11 सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास झाला. मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल वय 33 वर्ष, रा. कळमेश्वर, रोशनी अनूप जयस्वाल वय 30 वर्ष व माधुरी अंगद जयस्वाल वय 36 वर्ष दोघीही रा. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल वय 32 वर्ष दाेघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकाेना मध्य प्रदेश येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी हाेण्यासाठी गेले होते.