सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करा, आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन.

52

सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करा, आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन.

सौ.अरुणा तलाडे सरपंच ग्रा.प.पुरलगोदी राकेश आवडो उपसरपंच पुरसलगोदी.

सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करा, आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन.
सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खनन बंद करा, आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन.

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी ग्रामपंचायत हद्दीतील हेडरी गावाजवळील सुरजागड पहाडीवर सुरू असलेले लोहदगड उत्खननाचे काम ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून सुरू करण्यात आले.

ग्रामपंचायतची कुठलीही मंजुरी घेण्यात आली नाही.त्यामुळे सुरू असलेले काम तात्काळ बंद करावे असा ठराव पुरसलगोंदी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला.या संदर्भात १४ मे रोजी तहसीलदारामार्फत खासदार,आमदार,जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले,परंतु या संदर्भात कोणत्याही अधिकारी दखल घेतली नाही.

शासन व कंपनीने कायदेशीर पूर्वपरवानगी घेतली नाही.वनसंवर्धन अधिनियम १९८० व पर्यावरण अधिनियम १९८६ चे अनुपालन करण्यात आले नाही.तसेच पुनर्वसन आराखडा व इतर कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता ग्रामसभा व स्थानिक लोकांना अंधारात ठेवून मंजुरी दिली.

आदिम जमातीची संस्कृती व नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याकरिता सुरजागड येथे सुरू असलेले लोहखनिज उत्खननाचे काम तात्काळ बंद करावे,असा ठराव पुरसलगोंदी येथे घेण्यात आला.ग्रामसभेच्या ठरावातील सर्व मुद्यांच्या विचार करून उत्खननाचे काम बंद करावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.यावेळी सौ.अरुणा तलांडे सरपंच ग्रा.प.पुरसलगोंदी, श्री.राकेश कवडो उपसरपंच,सौ.प्रीतीलता कवडो सदस्य,श्री.मधुकर सडमेक सदस्य, श्री .अजय सडमेक सदस्य,दयालु कुजूर,निर्मळ गुंडरु,रमेश हिचामी,छाया जेहठी,सत्ती गुंडरु यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.