वर्धा जिल्ह्यात माघील 24 तासात 93 कोरोनामुक्त, 25 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू.
आतापर्यंत 47,317 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 375.

✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒️
वर्धा, दि.12 जुन :- वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात 93 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 25 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 1 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 49 हजार 006 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 47 हजार 317 झाली आहे. सध्या 375 ॲक्टीव पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत 3 लाख 87 हजार 554 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 34 हजार 925 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
वर्धा जिल्ह्यात आज 1 मृत झालेल्यामध्ये वर्धा येथील:- 36 वर्षीय महिलाचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 1314 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात आज कोरोना बाधीत आलेल्या 25 रुग्णांमध्ये वर्धा तालुक्यातील 14, हिंगणघाट तालुका 07, आर्वी 01, आष्टी 00, कारंजा 00, देवळी 01, सेलु 01, समुद्रपुर 00 रुग्णांचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली आहे.