सोशल मीडिया आणि कोरोनामुळे पेपर वाचक झाले कमी, वर्तमानपत्राची रद्दी मोल दराने विक्री

सोशल मीडिया आणि करोना . मुळे पेपर वाचक झाले कमी
वर्तमान पत्राची रद्दी मोल दराने विक्रि

सोशल मीडिया आणि करोना . मुळे पेपर वाचक झाले कमी वर्तमान पत्राची रद्दी मोल दराने विक्रि

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
8600942580

महाड : – एके काळी गाव असो की शहर असो सकाळ कधी होते व पेपर वाला कधी आपल्या कडे पेपर घेऊन येतोंय आणि आपल्याला पेपर कधी वाचायला मिळतोय अशी अवस्था होती . मात्र आज त्याच्या उलट झाले आहे .आज सोशल मीडिया मुळे आणि मागच्या दोनवर्षाच्या करोना काळा मुळे मोठ्या प्रमाणात वर्तमान पत्र वाचकांची संख्या कमी झाली असून छपाई केलेले पेपर वाचकांच्या कमी संख्या मुळे गठ्ठेच्या गठे रद्दीत विकले जातात आहेत.
आज सोशल मीडियाचा जोर आहे कोणतीही घटना असो राजकीय विषय असो अगर सामाजिक अथवा इतर कोणताही माहिती असो सोशल मीडियावर काही मिनिटातच पहावयास मिळते . गल्लीबोळात ब युट्युब चैनल सुरू झाले आहेत त्या मुळे आज नागरिकांन पर्यंत कोणतीही माहिती पोहचण्यास वेळ लागत नाही .गेली दोन वर्षे करोना महामारी मुळे संपूर्ण जगा मध्ये लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे प्रिंट मीडिया चा मोठ्या प्रमाणात वाचक कमी झाला आज च्या परिस्थितीत वाचक सकाळी स्टॉल वर पेपर घेण्या साठी लाईन लावत होते हे चित्र आज दिसत नाही घरी येणारे पेपर वाचकांनी बंद केले याला एक मेव सोशल मीडियाच आणि कोरोना चे कारण आहे.पैसे न खर्च करता २४ तास आपल्या भागातील आणि देशा पासून जगाच्या कान्या कोपऱ्यातील बातम्या सोशल मीडिया वर पहावयास मिळत आहेत.
करोना काळात पेपरची छपाई कमी झाली काही पेपर बंद ठेवण्यात आले .जे सुरू होते ते वाहने बंद असल्या मुळे वाचकान पर्यंत पोहचत नव्हते त्या मुळे पुढे याचा मोठा फटका प्रिंट मीडियाला बसला आज च्या परिस्थितीत ज्या ठिकाणी पेपर चा खप शेकडोने होता त्या ठिकाणी १० किंवा २० पेपर विक्री होत आहेत याचाच अर्थ वर्तमान पत्रांच्या वाचकांची संख्या कमी झाली आहे.पूर्वी पार्ट टाइम मध्ये शहर आणि गाव ठिकाणी गाडीतून येणारे अनेक वर्तमान पत्रांचे घरो घरी वितरण करण्याचे काम अनेक बेरोजगार तरुण मंडळी फावल्या वेळेत पहाटेच्या वेळी करत असत मात्र करोना मुळे ही मुले कामा वरून बंद झाली याचा फटका या बेरोजगार तरुणांना बसला ही वर्तमानपत्र टाकणारी शेकडो मुले बेरोजगार झाली पण याचा फटका आज वर्तमान पत्राला बसला व त्यांचा खप कमी झाला.
वर्तमान पत्रा चे नाक्या नाक्या वरचे स्टॉल झाले गायब
वर्तमान पत्राचे स्टॉल पूर्वी एसटी बस स्टँड , रिक्षा स्टँड , रेल्वे स्टेशन , व मोठ्या शासकीय कार्यालय समोर फावल्या वेळात चालवण्याचे काम अनेक बेरोजगार तरुण करत असत त्या मुळे अनेकांचे संसार चालत असत आणि मोठ्या प्रमाणात वर्तमान पत्रांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात केली जात असे.मात्र त्यांना देखील करोना चा फटका बसल्याने जागो जागी असलेले हे स्टॉल गायब झाले त्याचा फटका पेपर घेण्या साठी येणाऱ्या वाचक वर्गाला बसला त्याच बरोबर पेपरची देखील विक्री कमी झाली.
करोना काळात बहुतेक पेपर बंद झाल्याने पेपर मधून आपल्या व्यवसायिक जाहिरातीचे दर्शन घरोघरी व गावो गावी होत असे मात्र पेपरच नसल्या मुळे याचा फटका जाहिरात दारांना बसला त्याच बरोबर याचा फटका वर्तमान पत्रांना देखील बसला आहे.आज च्या घडीला सोशल मीडिया आणि करोना मुळे मोठ्या प्रमाणात वर्तमान पत्राचे वाचक वर्ग कमी झाले आहेत आज जरी स्टॉल वर पूर्वी सारखेच पेपर विक्रीसाठी आले तरी त्याला खपच नाही ज्या ठिकाणी एक एक वर्तमान पत्राचा १०० ते १५० खप होता तो १० आणि १५ वर आला आहे .एकंदरीत काय तर करोना आणि सोशल मीडियाचा चा फटका वर्तमान पत्र ते विक्री व वाचक वर्ग या सर्वांना बसला परिणामी मोठ्या प्रमाणावर वर्तमान पत्राचेच खच्ची करण झाले व वर्तमान पत्राची घडी न मोडताच आज रद्दीच्या भावात विक्री केली जात आहे.