वाघ व बिबट या वन्यप्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे याकरिता पंधरा फूट उंच जाळी बांधकामाला
सुरुवात.नितिन भटारकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश.
रवि दिलीप आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधि
मोबाईल क्रमांक- ९८९०८९७०२९
चंद्रपूर:- दुर्गापुर, उर्जानगर नेरी व कोंडी या परिसरात मागील काही महिन्यामध्ये वाघ व बिबट या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीव गेला असून
अनेक नागरिक जखमी झाले. वाघ व बिबट यांच्या सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे या परिसरातील नागरिक
मोठया प्रमाणात भयभीत होते. या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतर गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वनविभागाच्या निषेधार्थ रोष व्यक्त केला होता. तसेच वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्या या मागण्या केल्या होत्या. ज्या भागात झुडपी जंगल वाढलेले होते सर्व प्रथम डब्ल्यूसीएल प्रशासन व ग्रामपंचायतीने ते जंगल साफ करावे याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सतत पाठपुरावा केला होता.पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा डब्ल्यूसीएल प्रशासनाने
साफ सफाई न केल्याने एका ८वर्षाचा मुलाचा बळी गेल्यानंतर डब्लू सि एल व्यवस्थापकाच्या कार्यालयाची भटारकर यांनी तोडफोड सुद्धा केली होती. त्यानंतर लगेच या संपूर्ण परिसरातील जागेची तात्काळ साफसफाई करण्यात आली होती.राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सतत वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे या परिसरातील उपाययोजने संदर्भात सतत लेखी पाठपुरावा करण्यात येत होता. बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर वेकोली परिसरालगत असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक १, २ व ३ या भागात जास्त प्रमाणात दिसून येत होता.गावातील जमा झालेला कचरा ग्रामपंचायत द्वारे
ज्याठिकाणी फेकण्यात येत होता तिथेच या बिबट्या जास्त प्रमाणात येत असल्याने व तेथील नागरिकांवर
हल्ले करत असल्याने ग्रामपंचायत व डब्ल्यूसीएल द्वारे त्या जागेची साफसफाई करावे याबाबत पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर याच परिसराला सुरक्षित
करण्याकरिता वनविभागाकडे सतत लेखी पाठपुरावा करण्यात आला होता.त्या अनुषंगाने चंद्रपूर वन विभागातर्फे प्राथमिक स्तरावर
असुरक्षित असलेल्या जवळपास १.२५ किलोमीटर लांबीच्या या परिसराला सोलर लाईट सह १५ फूट उंच अशा जाळीने वेढण्यात येत असल्यामुळे या जंगलसदृश्य
भागाला लागून असलेल्या परिसरातून बिबट्याला या मानवी वस्तीत येणे शक्य होणार नाही. व यामुळे या
भागातील सर्वसामान्य नागरिक मात्र सुरक्षित होईल.या प्राथमिक स्तरावर सव्वा किलोमीटर लांब बांधण्यात
येणाऱ्या जाळीमुळे या भागातील काही कच्चे पायवाट असलेले रस्ते मात्र बंद होऊ शकते त्यामुळे या
परिसरातील नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने बांधकाम करण्यात येत असलेली ही जाळी तोडू नये असे आवाहन देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन
भटारकर यांनी प्रत्यक्ष परिसरातील नागरिकांना जाऊन केले.या जाळी बांधकामामुळे काही प्रमाणात तरी या
वन्यप्राण्यांपासून गावातील नागरिकांचे संरक्षण होणार
असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वनविभागाचे व ज्या अधिकाऱ्यांनी
याकरिता पुढाकार घेतला त्या वनाधिकार्यांचे आभार मानले.वनविभागातर्फे होत असलेल्या या बांधकामाचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा
अध्यक्ष श्री सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन
फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांदाळे, राहुल भगत, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लगतच्या परिवारातील सदस्यांना या जाळीचे संरक्षण करण्याकरिता विनंती सुद्धा केली.