न कळलेली सावित्रीआई फुले…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

    आजचा लेखाचा शीर्षक वाचून आपल्याला प्रश्न पडला असेल की,आज क्रांतिज्योती सावित्रीआई ची जयंती नाही आणि स्मृतिदिन सुध्दा नाही मग या विषयावर का बरं लेख लिहिले असावे. आपले म्हणने साहाजिकच आहे कारण प्रत्येकांचे वेगवेगळे विचार असतात त्या विचारांना आपण रोखू शकत नाही. असो, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या वर लिखाण करण्यासाठी कोणतेही मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण त्या मातेने समाजकार्य करण्यासाठी व याच समाजातील व देशातील मुलींना व महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या विकासासाठी कोणतेही मुहूर्त बघितले नाही तर रात्रंदिवस चंदनासारखे झिजून संपूर्ण आयुष्य पणाला लावले त्या महान मातेला आपण कसे विसरू शकतो…?

त्यांच्यावर लिहिण्यासाठी किंवा त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही तर..आधी त्यांना वाचणे अंत्यत गरजेचे आहे त्यासाठी एकदा स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की,आज आपण इथे आहोत ते नेमकं कोणामुळे. ..? कोणाच्या त्यागामुळे,कोणाच्या शिकवणीमुळे, कोणाच्या कष्टामुळे आज जेव्हा मोठ्या, मोठ्या उंच पदावर निवड नेमकी झाली ती कोणामुळे व सुखाने दोन घास खायला मिळत आहे जगात मिळणारा एवढा मोठा मानसन्मान कोणामुळे मिळत आहे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार कोणामुळे मिळत आहे,पुरुषांच्या खांद्याला, खांदा लावून जगण्याचा अधिकार कोणामुळे मिळत आहे, उंच शिखरावर कोणामुळे, पोहचायला मिळत आहे, रंगारंगाचे पुरस्कार कोणामुळे मिळत आहेत,ओळख कोणामुळे मिळाली आहे अशा अनेक गोष्टी आहेत या सर्व कोणामुळे मिळाल्या आहेत आणि दररोज मिळत आहेत याविषयी एकदा वेळात, वेळ काढून प्रत्येक महिलांनी तसेच पुरूषांनी सुद्धा विचार करायला पाहिजे.

https://mediavartanews.com/2023/06/11/ukraine-russia-war-latest-update/

    क्रांतिज्योती सावित्रीआई फुले अशा सहज कळणार नाही तर आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे पण,आपण काय करतो त्यांची जयंती किंवा स्मृतीदिन असले की, मात्र आठवण करत असतो आणि वर्षभर त्यांना विसरून जातो त्या जर..आम्हाला असेच विसरले असते,किंवा आम्हां सर्वाचा विचार केले नसते तर आज आपण कुठे असतो. ..? याचा कोणी विचार करावे…? 

      पुन्हा एक गोष्ट ती म्हणजेच महिलांच्या विषयी बोलायला गेले तर आज दररोज महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, मानसिक त्रास, हुंडाबळी, हिंसा, वाईट कृत्य, अपमान, तसेच अनेक घटना घडताना दिसत आहेत हे कोणापासूनही लपलेले नाही मग महिलांच्या विषयी एवढे सारे होताना पाहून महिला वर्ग का म्हणून तिच्या मदतीसाठी किंवा तिला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे होत नाही. ती स्वतः अभिमानाने म्हणत असते की, मी सावित्रीआई ची लेक आहे मग तिच्या लेकीवर असे प्रसंग घडून येतांना दिसतात तेव्हा ती जागी का होत नाही. .?

त्या एका काळी महिलांवर अन्याय होत होते चूल आणि मुल याच्यात ती जगत होती आणि निमूटपणे सर्व सहन करत होती हेच तिचे दु:खी जीवन बघून तिचा उध्दार करण्यासाठी त्या मातेने आपल्या अंगावर दगड,गोटे,चिखल, शिव्या, निंदा घेतले आणि आज त्याच मातेच्या संघर्षातून आजची महिला सुशिक्षित झाली आणि बघा ती जगते तरी कशी तेवढ्या महान मातेची लेक असून सुद्धा प्रसिद्धी कमविण्यासाठी स्वतः चा स्वाभिमान सुद्धा विकायला मागे, पुढे बघत नाही, एवढेच नाही तर महिलेची वैरीण बनून तिला बदनाम करण्यासाठी संधी सोडत नाही, स्वतः सुशिक्षीत असतांना सुद्धा आजही चूल आणि मुल सांभाळून नवऱ्याच्या येणाऱ्या पगारावर मज्जा करून आपल्या मोहल्यात खंडिभर महिला जमवून दिवस रात्र इतरांच्या निंदा करणे,मौजमज्जा करणे व इतर काही गोष्टी करण्यासाठी वेळ काढत असते खरंच अशी वागणून व व्यर्थ विचार करण्यासाठी त्या मातेने ह्या महिलांना शिक्षण दिले होते का…?

          आज बघायला गेले तर..आपण नेहमीच पुरूषांना दोष देत फिरत असतो की,पुरुषांनी महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे पण, आपण स्वतः मध्ये किती बदल करतो. .? हातात मुठभर पैसे असून सुद्धा अंगभर कपडे घालत नाही, नीट वागणूक नाही, हा सर्वात मोठा अपमान सावित्रीआईचा आहे कारण सावित्री आईने आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवली होती आज काहीच राहिले नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की, या महिलांमुळे सावित्रीआई चा अपमान होत आहे. त्यात पुन्हा एक गोष्ट ती म्हणजेच की,आजची महिला दररोज असे अनेक सन्मान मिळवते तेही सावित्री आईच्या त्यागामुळे पण एवढे वर्ष होऊन सुद्धा सावित्रीआई ला व महात्मा ज्योतिबा फुलेंना अजूनही सर्वोच्च असलेला भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही यासाठी का बरं ती पुढे होत नाही…?

म्हणजे कुठेतरी ती,स्वार्थी होऊन जगत आहे म्हणूनच तर पाऊल उचलू शकत नाही. सावित्री आईनी या महिलांना असल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी संघर्ष केला नाही तर..प्रत्येक महिला संक्षम बणली पाहिजे,धैर्यवान बणली पाहिजे, हिंमतीने जगली पाहिजे, समाजासाठी कार्य केली पाहिजे व एक नारीशक्ती बणून आपली ताकत जगाला दाखवली पाहिजे पुन्हा बरच काही यासाठी त्या माऊलीने संपूर्ण आयुष्य पणाला लावले पण आजचई ही महिला मात्र सर्वच विसरून गेली आहे आज प्रत्येक महिलांनी जर..सावित्रीआईला वाचले असते तर पूर्णपणे सावित्रीआई कळली असती पण,शोकांतिका म्हणावे लागेल की, आजच्या सुशिक्षित असलेल्या महिलांना अजूनही न कळलेल्या सावित्रीआई फुले आहेत हेच फार मोठे दुर्दैव आहे.

https://mediavartanews.com/2023/06/11/freedom-fighter-ramprasad-bismil-2/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here