सामाजिक न्याय विभागाचा लोकशाही दिन 30 जून रोजी
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230
चंद्रपूर,दि. 12 जून : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या आयोजनानुसार महिन्यातील शेवटच्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबतचे निर्देश दिले आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयातील असलेल्या योजनाबाबत काही तक्रारी असल्यास ते लोकशाही दिनामध्ये सादर कराव्यात, जेणेकरून त्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयात सोमवार 30 जून रोजी रोजी दुपारी 12 वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहे, चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेनी या लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या तक्रारी असल्यास सादर कराव्यात, असे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.