बुरखा घालून आलेल्या युवकाच्या गोळीबारात एक युवक जखमी.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mobile….. 9834024045
12जुलई …… बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहे आहेत.
येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. त्या युवकाने परिसरातील एका युवकावर गोळीबार करून पळ काढला. या घटनेला सुरज बहुरिया हत्याकांडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. गोळीबार करणाऱ्या आणि जखमी युवकांची नावे कळू शकली नाही.