पुण्यात आध्यामिक बाबाच्या सांगण्यावरुन प्रतिष्ठीत कुटुंबाने केला सुनेचा अतोनात छळ. तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. असे या नराधम बाबाने सांगून विवाहित महिलेच्या छळ करण्यास केले प्रवृत्त , नराधम आध्यामिक बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

पुण्यात आध्यामिक बाबाच्या सांगण्यावरुन प्रतिष्ठीत कुटुंबाने केला सुनेचा अतोनात छळ.

तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. असे या नराधम बाबाने सांगून विवाहित महिलेच्या छळ करण्यास केले प्रवृत्त ,

नराधम आध्यामिक बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

पुण्यात आध्यामिक बाबाच्या सांगण्यावरुन प्रतिष्ठीत कुटुंबाने केला सुनेचा अतोनात छळ. तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. असे या नराधम बाबाने सांगून विवाहित महिलेच्या छळ करण्यास केले प्रवृत्त , नराधम आध्यामिक बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.
पुण्यात आध्यामिक बाबाच्या सांगण्यावरुन प्रतिष्ठीत कुटुंबाने केला सुनेचा अतोनात छळ.
तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे. असे या नराधम बाबाने सांगून विवाहित महिलेच्या छळ करण्यास केले प्रवृत्त ,
नराधम आध्यामिक बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

पुणे MVN क्राईम रिपोर्टर

पुणे,दि.12 जुलै:- महाराष्ट्राची शैक्षणीक राजधानी असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार, मंत्री कधीच होणार नाही, तिच्या पासून लवकरात लवकर फारकत होत काडीमोड घे, असे सांगून या नराधम आध्यात्मिक बाबाने पुण्यातील प्रतिष्ठीत असलेल्या कुटुंबाला आपल्याच सुनेचा अतोनात छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आध्यात्मिक बाबाला बेळ्या ठोकल्या आहे.
रघुनाथ राजाराम येमुल वय 48 वर्ष, रा. धवलगिरी अपार्टमेंट, बाणेर असे या आध्यात्मिक नराधम बाबाचे नाव आहे.

आध्यात्मिकतेच्या नावावर देशात सध्या जनतेला लूटणा-या बाबा, संत, गुरु यांच मोठ्या प्रमाणात पीक आल असल्याच चित्र आहे. त्यात अजुन एका रघुनाथ येमुल या बाबाची भर पडली आहे. पुणे जिल्हात या बाबाचे शेकडो भक्त असल्याचे बोलले जात आहे. पोलिसानी या बाबाला बेड्या ठोकल्यामुळे पुणे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने या बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याप्रकरणी एका पिढीत महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी गणेश ऊर्फ केदार गायकवाड, नानासाहेब गायकवाड, नंदा गायकवाड, सोनाली गवारे, दीपक गवारे, भागीरथी पाटील, राजू अंकुश अशा 8 जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी या डिसेंबर 2019 मध्ये रात्री आपल्या बाळासह बेडरुममध्ये झोपल्या असताना त्यांना कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तेथे सोनाली व दीपक गवारे हे बेडरुमच्या बाहेर हळदी कुंकु लावलेल्या टचण्या मारलेल्या लिंबु एका पिशवीमध्ये ठेवताना त्यांना दिसले. त्यांनी हा प्रकार आपले पती गणेश यांना सांगितला. त्यानंतर गणेश याने फिर्यादी यांना सांगितले की, रघुनाथ येमुल हे माझे गुरु आहेत. व त्यांनी तू अवदसा असून, पांढर्या पायगुणाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे. त्यामुळे सर्व ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्रीही होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगाही तिच्याकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबू उतरविल्याने तुझ्या मागची ही पिडा कायमची निघून जाईल. त्यामुळे गणेशने येमुल यांनी दिलेले लिंबु फिर्यादीवरुन उतरवून टाकले. याची माहिती मिळाल्यावर चतु:श्रृंगी पोलिसांनी रघुनाथ येमुल यांना अटक केली.