जितेंद्र आव्हाड युवा मंचाचा* *आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा* *हात..!!*

*जितेंद्र आव्हाड युवा मंचाचा* *आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा* *हात..!!*

जितेंद्र आव्हाड युवा मंचाचा* *आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा* *हात..!!*
जितेंद्र आव्हाड युवा मंचाचा* *आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा* *हात..!!*

 

अभिजीत सकपाळ
 भिवंडी ठाणे प्रतिनिधी
  9960096076
मिडीया वार्ता न्यूज भिवंडी,

 

जितेंद्र आव्हाड युवा मंच म्हणजे एक आदर्श चळवळ.. समाजातील लोकांचे वैचारिक प्रबोधन करून समतापूरक आणि शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांना अभिप्रेत असा समाज निर्माण करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन हे युवकांचं संघटन या राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष Adv.प्रमोदजी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहे.नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सभेमध्ये आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा सचिव श्री चंद्रकांत जाधव आणि चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत निकम हे उपस्थित होते.कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे मात्र आदिवासी मुलांकडे यासाठी आवश्यक मोबाईल अथवा इंटरनेट सुविधा नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही त्यामुळे किमान एखादा लॅपटॉप मिळाला तर ही समस्या दूर होईल अशी मागणी चंद्रकांत जाधव यांनी केली होती.त्यानुसार जितेंद्र आव्हाड युवा मंच,रत्नागिरी जिल्हयाच्या वतीने या मागणीची पूर्तता करण्यात आली.दि.११ जुलै २०२१ रोजी जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी पेडणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री शाहिद खेरटकर,चिपळूण तालुकाध्यक्ष श्री सज्जाद कादरी,शहराध्यक्ष श्री रवींद्र आदवडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकजी भुस्कुटे यांच्या हस्ते नांदीवसे येथे वाडीवर जाऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप प्रदान करण्यात आले.या लॅपटॉपचा पाच वाडीतील साधारण ५० विद्यार्थ्यांना लाभ होणार असून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कातकरी समाजातील एक सुशिक्षित युवक महेश जाधव यांनी घेतली आहे.विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिल्याबद्दल आदिवासी समाजातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे आभार मानले .