मुंबई बेस्टच्या वाहकाने केली 8 वीच्या अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची विचारणा.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.11 जुलै:- 3 वर्षा अगोदर मुंबईत चालत्या बेस्टच्या बस मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली होती. ही घटना 24 जुलै 2018 रोजीची आहे. एक 13 वर्षिय अल्पवयीन मुलगी मुंबईतील बेस्टच्या बसमधून प्रवास करत होती. दरम्यान बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. यावेळी आरोपी कंडक्टर पीडितेच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. यावेळी त्यानं पीडितेशी लगट करत शरीरसुखाबद्दल काही माहीत आहे का? अशी विचारणा केली. आरोपी कंडक्टरच्या या प्रश्नानं घाबरलेल्या अल्पवयीन मुलीनं असा प्रश्न न विचारण्याची विनंती केली. पण काही वेळानं आरोपी बस वाहकानं हाच प्रश्न दुसऱ्यांदा विचारला.
यानंतर ही अल्पवयीन मुलगी पुर्णत घाबरुन गेली होती. या पीडित मुलीनं याबाबतची माहिती आपल्या एका मैत्रिणीला दिली. मैत्रिणीनं याची माहिती पीडितेच्या आईला दिली. मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत असताना, सुरुवातीला पीडितेच्या मदतीनं आरोपी कंडक्टरची ओळख पटवली. यानंतर आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली.
याप्रकरणी 3 वर्षा नंतर मुंबईतील सत्र न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला. सरकारी वकील यानी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. न्यायालयानं पीडितेचा जबाब लक्षात घेत आरोपीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला 15 हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. चंद्रकांत कोळी असं आरोपी बस कंडक्टरचं नाव असून तो मुंबईतील बेस्ट बसमध्ये कार्यरत होता.