शिवसेनेचे नेते माजी आ. अशोक शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र? कॉग्रेसमध्ये जाण्याचे संकेत.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट 12:- शिवसेनेचे नेते व हिंगणघाट मतदार संघाचे सेनेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आ. अशोक शिंदे यांनी शिवसेनेचे बंधन सोडून काँग्रेसचा हात धरण्याचे निश्चित केले असून दोन दिवसात अशोक शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असे विश्वसनीय वृत्त आहे.

याबाबत मागील एक वर्षांपासून सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी खा अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यातच गुढे यांनी मागील आठवड्यात येथे पत्र परिषद घेऊन स्पष्ट शब्दात शिंदे यांचा विषय शिवसेनेतून संपला असल्याचे सांगून एक प्रकारे शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

अशोक शिंदे यांनी मुंबईत जाऊन पक्ष नेतृत्वा कडे या बाबत न्याय मागितला परिणामी संपर्क प्रमुख गुढे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच भेट घेतली. पटोले यांनी त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचे खात्री लायक वृत्त असून येत्या दोन दिवसात शिंदे हे काँग्रेस मध्ये प्रवेश घेणार हे निश्चित !