तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी.

तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी.

तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
तोहोगाव येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- कोरोणाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे तर कोरोणापासून बचाव करण्यासाठी सर्वांना लसीकरण करणे आवश्यक आहे म्हणून १८ ते ४५ वयोगटातील नागरीकाने कोरोना लसीकरण करणे आवश्यक आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत ..तोहोगाव इतरत्र बाहेर जाऊन त्यांना लसीकरण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव येथे कोरोना लस उपलब्ध करण्याची मागणी बंडू मधूकर गौरकार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्याताई गूरणूले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी श्री सुनील भाऊ उरकूडे कृषी सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर श्री राजू भाऊ गायकवाड जिल्हा परिषद सभापती व श्री धनराज कोवे हे उपस्थित होते.