अतिवृष्टीने वेलगूर तलावाची पाळ फुटली

अतिवृष्टीने वेलगूर तलावाची पाळ फुटली

अतिवृष्टीने वेलगूर तलावाची पाळ फुटली

स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधी
8806516351

अहेरी : – अतीवृष्टी मुळे वेलगुर येथील मामा तलावाची मुख्य पाळ फुटल्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहायला सुरुवात झाली सदर माहिती अहेरीचे तहसीलदार ओंकार औतारी यांना कळताच त्यांनी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी सोबत घेऊन युद्ध पातळीवर स्थानीक नागरीकांचे सहकार्य घेत सदर गंभीर परिस्थीतीचे प्रसंगावधान पाहत मोहीम राबविली पाळ मध्ये माती,गिट्टी व रेती तसेच लाकडाच्या सहाय्याने त्यात धान पिकाच्या तनीस चा वापर करत पाण्याचा प्रवाह थांबवीत सदर गंभीर परिस्थीतीवर नियंत्रण
आणले.
यावेळी उपसरपंच उमेश मोहर्ले, तालुका अधिकारी डॉ किरण वानखेडे, पोलिस निरीक्षक श्याम गव्हाने, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, जिल्हा परिषद अभियंता साईनाथ तुमपट्टीवार , अभियंता सुमेध उंदिरवाडे, अभियंता किशोर वाळके, महसुल अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी व्येकटेश जल्लेवार , प्रवीण गाठले, ग्रामसेवक राजेश बाटवे, वनपाल पुऩमचंद बुद्धावार, आपत्ती व्यवस्थापन पोलीस उपनिरीक्षक ओमनाथ भंडारे, वनपाल अनिल झाडें, क्षेत्र सहाय्यक वेलगुर साईनाथ मडावी, वनरक्षक वेलादी, मडावी, मनोहर चालूरकर आदींनी अथक परिश्रम घेतले. प्रसंगी महसूल विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग आणि पोलीस विभाग तसेच गावातील लोकांनी अथक परिश्रम घेतल्याने अनर्थ टळला.