अंमलदारांचा उत्कृष्ठ दोषसिद्धीसाठी सत्कार

अंमलदारांचा उत्कृष्ठ दोषसिद्धीसाठी सत्कार

अंमलदारांचा उत्कृष्ठ दोषसिद्धीसाठी सत्कार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /वाशिम

जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस दलातील सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असलेल्या एकूण ०७ अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यामध्ये पोहवा / २७४, गजानन महादेव सरोदे यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी तर पोना / १०८४, संतोष रामराव ईढोळे, पोना / १०९० विनोद मारोती अवगडे, मपोना / १०५९ संगीता दादाराव राऊत, पोना / १०४४ प्रदीप बंशिराम जाधव, पोना / ७९७ नागेश देविदासराव देशमुख, पोना / ९४० विष्णू यादवराव मोटे यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली. आज रोजी पोलीस अधीक्षक • कार्यालय वाशिम येथील सभागृहात सर्व पदोन्नत झालेल्या पोलीस अंमलदार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वि न्यायालयात हजर राहून दोषसिद्धी प्राप्त व्हावी यासाठी वि. न्यायालयात हजर राहून विशेष कामगिरी करणाऱ्या कोर्ट पैरवी अंमलदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. . यामध्ये पो. स्टे. मालेगाव येथील पोकों / २२८ केशव इरतकर यांना अप. क्र. ३२० / १६क. ३५३ भादंवि मध्ये, पो. स्टे. रिसोड येथील नापोकों / १९० अमर ठाकूर यांना अप. क्र. ४९९/१९. ३५४ भादंवि व पोक्सो मध्ये, पो स्टे मंगरूळपीर येथील नापोकॉ/११८३ गफूर पप्पुवाले यांना अप. क्र. २८६/१७ क. ३७६ भादंवि सह पोक्सो, पो. स्टे. आसेगाव येथील पोकों/ ८८७ हर्षल हिवराळे यांना अप. क्र. ७६/१८ क. ३७६ भादंवि सह पोक्सो मध्ये, पो. स्टे. मानोरा येथील पोहेकॉ रामेश्वर जगताप यांना अप. क्र. ११७/१६ क. ३७६ भादंविसह पोक्सो मध्ये, पो. स्टे शिरपूर येथील पोकॉ. /८९१ गणेश कोकाटे यांना अप. क्र. ८८/१३ क. ४९८, ३२४ भादंवि व अप. क्र. १०७/२२क. ८ NDPS मध्ये, पो. स्टे. मंगरूळपीर येथील मपोकॉ. / १२७६ सुप्रिया डोंगरे यांना अप. क्र. २९२/१४ क ३३७, ३२४ भादंवि व अप. क्र. १६४/१५ क ३२६, ३२४ भादंवि मध्ये, पो. स्टे आसेगाव येथील मपोहेकॉ / २९८ वैशाली भिसे यांना अप क्र. ४२/१५ क ३२४ भादंवि अप क्र. ४३/१५ क. ३२४ भादंवि मध्ये दोषसिद्धी प्राप्त केल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला त्यावेळी पो. नि. सारंगधर नवलकर, कल्याण शाखा, वाशिम व टि. एम. सी. सेलचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक मनिषा तायडे व पोलीस अंमलदार हजर होते.✍