अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे वाशिम जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय संमेलन संपन्न

45

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे वाशिम जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय संमेलन संपन्न

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्युज

मो:8208166961

कारंजा:अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद च्या वतीने वाशिम जिल्हास्तरीय एक दिवसीय साहित्य संमेलन रमाई नगर कारंजा येथे मोठ्या उत्साहात दिनांक ९ जुलै रोजी पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अमरावती विभाग अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक शिवा प्रधान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे साहेब, प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश जंजाळ सर, राज साहेब इंगळे, पद्माकर मांडवधरे महेंद्र ताजने,सौ. वर्षाताई इंगळे, सौ. नंदिनीताई वैराळे,सौ. शेजवताई ,राम शेजव,प्रा.संजय धांडे, आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने, कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर साहित्य परिषदेचे वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. संजय धांडे यांनी जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कर्याची माहिती उपस्थितांना आपल्या प्रास्ताविकातून नमूद केली, तर परिषदेचे विदर्भ प्रदेश सहसचिव राज साहेब इंगळे, व अमरावती विभाग अध्यक्ष शिवा प्रधान सर, यांनी अमरावती येथे विभागीय स्तरावर संपन्न होत असलेल्या 23 जुलै च्या संमेलनाच्या आयोजना मागची भूमिका व साहित्य चळवळ याविषयी माहिती आपल्या भाषणातून सांगितली,त्यानंतर उपस्थित साहित्यिकांचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे व कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक तथा साहित्य परिषदेचे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष राम शेजवसर यांनी केले, काव्यसंमेलनाला प्रसिध्द साहित्यिक महेंद्र ताजने,प्रा.प्रकाश जंजाळ सर,राम शेजव सर,प्रा.संजय धांडे, गजानन घुबडे, किरणकुमार मनवर,सौ.वर्षाताई इंगळे,सौ.नंदिनीताई वैराळ,सौ.विद्याताई शेजव, कैलास तेलंग,हि.रा.गवई, पद्ममाकर मांडवधरे, राजसाहेब इंगळे,पंकज रोकडे, भगवान इंगळे,कु.अनुपमा बनसोड,कु.प्राची राठोड, यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण केले, प्रसंगी उपस्थित सर्व साहित्यिक व कवींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन साहित्य परिषदेचे वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष राम शेजव सर यांनी केले.