वाकी आदिवासीवाडी येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी विद्यार्थीनीला सर्पदंश झाल्याचे समजतात शिक्षकांच्या प्रसंगावधाना मुळे विद्यार्थीनीचा वाचला जीव…..

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-माणगांव तालुक्यातील वाकी आदिवासीवाडी येथील इयत्ता ४ थीमध्ये शिकणारी मंजूला हरेश मुकणे हिला सर्पदंश झाल्याची माहिती शिक्षकांना मिळताच शाळेतील शिक्षकांनी तिच्यावर योग्यवेळी योग्य उपचारासाठी धावपळ केली. मजुलाच्या जीवावर बेतलेला वाईट प्रसंग टळला दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे एका विद्यार्थीनीचा जीव वाचविण्यात यश प्राप्त झाले .

मंजूला ही शाळेत नं येता आईच्या सांगण्यावरून कपडे धुण्यासाठी गावातील ओढ्यावर गेली होती कपडे धुवून झाल्यावर कपडे वाळत घालत असताना तिला त्याठिकाणी सर्पदंश झाला मंजुळा त्याठिकाणाहून धावत पळत घरी परंतली असता शाळेत जाणाऱ्या मैत्रिणीला मला सर्पदंश झाल्याचे सांगितले मी येणार नाही तू जा व पुन्हा आपले राहिलेले कपडे वाळवण्यासाठी ओढ्यावर गेली घडलेला प्रकार मैत्रीणीने शाळेतील शिक्षकाना सांगितलं असता.

शिक्षकांनी क्षणाचाही विचार न करता मुख्याध्यापक अविनाश खोमणे व शिक्षिका अर्चना शेळके यांनी घटनास्थळी गावातील ओढ्यावर जाऊन सर्पदंश झालेल्या मंजुळा मुकणे व तिच्या आईला आपल्या ताब्यातील असणाऱ्या मोटारसायकलवर बसवून निजामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले डॉक्टरानी तपासणी केली असता मंजुळा हिला सर्पदंश झाल्याच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले व डॉक्टरानी प्रथम मंजुळा हिला माणगांव उपजिल्हा रुग्णालय येथे हळविण्याचे सांगितले असता शिक्षकांनी मंजुळा हिला माणगांव येथे रुग्णालयामध्ये येथे दाखल केले असता काही वेळातच डॉक्टरांनी मंजुळा हिच्यावर उपचार सुरु केले.असता डॉक्टरांनी मंजुळा आता व्यवस्थित आहे काळजी करण्याचे काही कारण नाही हे सांगताच मंजुळा हिची आई व तिच्या परिवाराला आनंद झाले या दोन शिक्षकामुळे मंजुळा हिचा जीव वाचल्याने सगळीकडे त्याचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here