अलिबाग शहरात तरुणीचा विनयभंग
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग शहरातील मुन्ना चायनीज शेजारी असलेल्या गल्लीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. तिच्याकडून तिच्या आईचे दोन लाख 86 लाख रुपयांचे दागीनेदेखील घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञेश घरत असे या आरोपीचे नाव आहे. हा परहूरपाडा येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात मारामारी, धक्काबुक्की, शाब्दिक वाद केल्याप्रकरणी यापुर्वी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अलिबाग तालुक्यातील पिडीत मुलीसोबत त्याची ओळख होती. पिडीत मुलगी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. महाविद्यालयामध्ये विनयभंग करून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली होती. हा प्रकार करू नये, म्हणून त्याने तिच्या घरातून जबरदस्तीने आईचे दागिने आणण्यास तिला सांगितले. भितीपोटी मुलीने घरातील दोन लाख 86 हजार रुपये किंमतीचे दागीने आणून अलिबाग शहरातील मुन्ना चायनीज शेजारी असलेल्या गल्लीत त्याला दिले. मात्र त्याने त्या गल्लीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो विवाहित असल्याची माहिती समोर येत आहे.