शिष्यवृत्ती परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत चिंतामणराव केळकर विद्यालयाचे सुयश

13 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त

रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबागमधील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे. विद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
माध्यमिक विभागातील इयत्ता आठवीतील एकूण नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
अक्षरा सुरेश वानखडे, देवश्री कुलदीप टेमकर, दुर्वाक्षी रमेश कुथे, समृ‌द्धी राहुल लोखंडे, शमिका शरण पाटील, श्रावणी भालचंद्र भगत, देशना आकाश ओसवाल, अविष्कार युगेश पाटील, प्रज्वल नितीन सातमकर. हे नऊ जण चांगले गुण संपादित करत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
इंग्रजी माध्यम प्राथमिक माध्यमातील आर्य देवेंद्र पाटील आणि अथर्व निलेश सावंत या दोन विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत (इयत्ता ५ वी) घवघवीत यश संपादन केले.
तसेच सेमी इंग्रजी माध्यमातील अद्वैत वैभव जोशी आणि ओम अमर तानुगडे यांनी देखील चांगले गुण संपादित करत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष अमर वार्डे आणि प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.