श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडीयम शाळेत वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार
– सिद्धेश पवार,
– तालुका प्रतिनिधी पोलादपूर
– 8482851532
पोलादपूर :- पोलादपूर श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम स्कूल, पोलादपूर येथे शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सध्याच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे संवर्धन व भविष्यकालीन पिढ्यांसाठी हरित वारसा टिकवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. याच उद्देशाने शाळेने “प्रत्येकाने लावा एक झाड” हा संदेश घेऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला.
या उपक्रमात नववी आणि दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे व औषधी वनस्पतींची रोपे शाळेत आणली. नियोजनबद्ध पद्धतीने खड्डे खोदून झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” या संकल्पनेवर आधारित पोस्टर्स आणि चित्रांची देखील सादरीकरण केले. या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा महत्वाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा उतेकर, शिक्षिका श्रीमती कल्याणी वाडकर आणि निधी पटेल यांची विशेष उपस्थिती लाभली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची ग्वाही दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाण निर्माण करणारा ठरला असून परिसरात सकारात्मक संदेश पोहोचवण्यात शाळेला यश मिळाले आहे.