अल्पशा परवानगीने कालेता येथे मुरुमाचे भरमसाठ उत्खनन*

*अल्पशा परवानगीने कालेता येथे मुरुमाचे भरमसाठ उत्खनन*

अल्पशा परवानगीने कालेता येथे मुरुमाचे भरमसाठ उत्खनन*
अल्पशा परवानगीने कालेता येथे मुरुमाचे भरमसाठ उत्खनन*

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
📱9420182174
ब्रम्हपुरी :-
अवैध रेती तस्करी व ईतर गौण खनिज उत्खणनं मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रम्हपुरी तालुका सरस ठरत असून जिल्हा उत्खननं विभागाची वारंवार तालुक्यात होतं असलेल्या कार्यवाई चा स्थानिक तालुका महसूल प्रशासनावर कुठलाही प्रभाव होतं नसल्यागत अगदी शहरालगत हाकेच्या अंतरावर कालेता येथे खुलेआम अल्पशा परवानगी च्या नावावर मुरुमाचे भरमसाठ अवैध उत्खननं होतं असल्याने तालुक्यातील जनते मध्ये विविध शंकेला पेव फुटत आहे.

गौण खनिजा अंतर्गत मिळणाऱ्या महसूला मधून शासनाद्वारे विविध प्रकारे जनतेचा विकास साधल्या जातो त्या करिता शासन, प्रशासना मार्फत निधी संकलन करतो मात्र स्व:हीत जपण्यात गुंतलेले काही प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी लाचखोरी ने अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देतांना दिसून येत असून अवैध गौण खनिज माफियांना पाठीशी घालत आहेत.

कालेता येथे
शंभर ब्रास अल्प मुरूम उत्खननं परवानगी मिळवून भरमसाठ अवैध उत्खननं करत संबंधीत ठेकेदारांनी महसूल प्रशासनाला हाताशी घेत शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुळवल्याचा आरोप होतं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित जागेचा मोजमाप करून दोषीवर कार्यवाई करावी अशी मागणी जनतेतून होतं आहे.