राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांच्या उपस्थितित जनता दरबार

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
कारंजा (घाडगे), दिनांक 11 ऑगष्ट:- राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थिति मधे स्थानिक विश्रामगृह कारंजा (घाडगे) येथे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्या समस्या मार्गी लावण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
सदर वृत्त असे की कारंजा (घाडगे) तालुक्यातील अनेक गावांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच त्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात तालुक्यातील नारा, तारासावंगा, सावरडोह, सूसुंद्रा, मणिकवाडा, बोरगांव व इतर गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यात आल्या. आंगनवाड़ी सेविकांच्या मागनिचे निवेदन सुद्धा स्विकारण्यात आले. तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या कार्याचा सुद्धा आढावा घेण्यात आला. या जनता दरबारात तालुक्यातील अनेक गावातील सरपंच व इतर लोकांनी सहभाग घेतला.