जालना येथे बंदूक आणि चाकूचा धाकावर बियर बारमध्ये लूट; पैसे,मोबाइल,दारूच्या बाटल्यांघेऊन आरोपी फरार.*

*जालना येथे बंदूक आणि चाकूचा धाकावर बियर बारमध्ये लूट; पैसे,मोबाइल,दारूच्या बाटल्यांघेऊन आरोपी फरार.*

जालना येथे बंदूक आणि चाकूचा धाकावर बियर बारमध्ये लूट; पैसे,मोबाइल,दारूच्या बाटल्यांघेऊन आरोपी फरार.*
जालना येथे बंदूक आणि चाकूचा धाकावर बियर बारमध्ये लूट; पैसे,मोबाइल,दारूच्या बाटल्यांघेऊन आरोपी फरार.*

*✒सतिश म्हस्के✒*
*जालना जिल्हा प्रतिनिधी*
9765229010
जालना,12 ऑगस्ट:- जालना जिल्हातील बदनापुर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बंदुक आणि चाकूच्या धाकावर बारमध्ये लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात ही घटना घडली असून संपूर्ण घटना ही बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 11 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

बदनापूर शहरात असलेल्या विराज बियर बारमध्ये दोन अज्ञात दरोडेखोर आता शिरले दोन्ही आरोपींनी आपल्या चेहऱ्यांवर मास्क लावून चेहरे झाकलेले होते. सायंकाळच्या सुमारास दोघेही बारमध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांनी आपल्याकडील बंदूक आणि चाकू बाहेर काढत लूट केली.

बारमालक शिवाजी अंभोरे याच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बारमधील गल्ल्यातील रोख रक्कम, 4 ग्राहकांचे मोबाइल फोन, एका पिग्मी एजंटचे पैसै आणि बारमधील दारूच्या बाटल्यांची आरोपींनी लूट केली आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. लुटीची ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, आरोपी हे बिंधास्तपणे बारमध्ये शिरतात आणि त्यानंतर आपल्याकडी शस्त्रांचा धाक दाखवत अगदी सहजपणे लूट करुन निघूनही जातात. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.