नागपूर दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीची झाली प्रसूत; वडीलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे प्रेमप्रकरणातून शारीरिक संबध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती झाली. हा प्रकार आई-वडिलांच्या उशिरा लक्षात आल्यानंतर रुग्णालयात प्रसूती झाली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) ही नववीत असताना एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. रियाचे आई-वडील बांधकामावर मजुरी करतात. आईवडील कामावर निघून गेल्यावर रिया युवकाला भेटायला जात होती. त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. वयाच्या १४ व्या वर्षीच रियाला दिवस गेले. आई-वडिलांना सांगितल्यास घरातील वातावरण बिघडेल आणि मारही खावा लागेल. तसेच मुलाचे नावही सांगावे लागेल.
तिने गर्भवती झाल्याची माहिती प्रियकराला सांगितली. परंतु, त्याने लगेच नकार देत सुटका केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सहा महिन्यांची गर्भवती असताना हा प्रकार आईच्या लक्षात आला. तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावरही काहीही सांगायला तयार नव्हती. त्यामुळे आई-वडिलांनी डॉक्टरकडे नेले आणि गर्भपाताबाबत चौकशी केली. मात्र, डॉक्टरांनी नकार देत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.
तिच्या आई-वडिलांनी नाइलाजास्तव मुलीची समजूत घालून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपासून तिची आईने काळजी घेतली. सोमवारी ती बाथरूममध्ये पडली. त्यामुळे तिला लगेच रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिने मुलाला जन्म दिला. ती बेशुद्धावस्थेत आहे. मात्र, दुसरीकडे झालेल्या बाळाच्या वडीलावर बलात्काराचा गुन्हा यशोधरानगर पोलिसांनी दाखल केला आहे. बाळाच्या वडिलाबाबत रियाच्या पालकांनी काहीही माहिती नाही. त्यामुळे मुलगी शुद्धीवर आल्यानंतरच पोलिस आरोपीबाबत निर्णय घेणार आहेत.
बाळाचे काय होणार?
रियाने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, तिच्यावर अल्पवयात मातृत्व लादण्यात आले. ती बाळाच्या बापाबाबत काहीही बोलण्यास तयार नाही. अज्ञात युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे प्रियकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर थेट तुरूंगात रवानगी होणार आहे. बाळाची जबाबदारीचे कोण घेणार, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थी दशेत असल्याने बळजबरी मातृत्व आल्याने तिचे भविष्यही अंधकारमय झाले आहे.