*केशवराव ठाकरे परिवार यांचेकडून सत्कार – उपसरपंच वासुदेवजी चापले तथा मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.*
*ग्रामपंचायत अंतर्गत 10 वी पास झालेल्या 25 विद्यार्थ्यांचा आणि 12 वी पास झालेल्या 15 विद्यार्थ्यांचा अशा एकूण 40 विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व वृक्ष भेट देवून गौरव.*

*ग्रामपंचायत अंतर्गत 10 वी पास झालेल्या 25 विद्यार्थ्यांचा आणि 12 वी पास झालेल्या 15 विद्यार्थ्यांचा अशा एकूण 40 विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व वृक्ष भेट देवून गौरव.*
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
*राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी दिन सोहळा मोठया थाटात मंगी (बु) येथे साजरा करण्यात आला. गावातील सर्व समाजबांधवानी रॅली काढण्यात आली. गावातील सर्वांनी वृक्षदिंडी काढण्यात आली. गावातील कुमराम भिमू, क्रांतिवीर शहिद बाबुराव शेडमाके तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिंडी धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो पेनठाणा येथे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली.*
*सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ व वृक्ष भेट देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे हे होते तर उदघाटक म्हणून उपविभागीय अधिकारी राजा पवार हे होते. कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तहसिलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण येरमे, पं.स.चे कृषी अधिकारी गजानन ढवस, नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, BCI कार्यक्रम समन्वक संतोष विश्रोजवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव ठाकरे, लताताई ठाकरे, राष्टपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. सुधाकर मडावी. माजी सैनिक बंडू कुमरे, माजी जि.प. सदस्य भिमरावजी पुसाम, कृषी विस्तार अधिकारी चुन्ने, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम मेश्राम, तलाठी समीर वाटेकर, केंद्र प्रमुख शेषराव वानखेडे, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश वेडमे, पेसा समितीचे अध्यक्ष जिवनाबाई कोटनाके, संगीता कोडापे, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी उपसरपंच वासुदेव चापले, सोनबत्तीताई मडावी, ग्रामसेवक गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, अंबुजा सिमेंट फाऊन्डेशनचे समन्वयक सरोज अंबागडे, सिध्देश्वर जंपलवार, गाव पाटील सोमाजी कोडापे, संभाजी पा. लांडे, गुलाब चव्हाण, मोतीराम पा. पेंदोर, सखाराम चनकापुरे, व्यंकाजी पा. मडावी, माजी ग्रामसेवक मरापे, विहीरगावचे ग्रामसेवक सुर्यवंशी, शंकर तोडासे, यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.*
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम तोडासाम यांनी केले..*
*या प्रसंगी केशवराव ठाकरे व त्यांच्या पत्नी यांचेकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगी(बु) च्या विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण करण्यात आले..*
*आदिवासी दिनाची सखोल व विस्तृत माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण येरमे यांनी विशद केली, कृषी विषयक माहिती तथा रानभाजी विषयी माहिती मोरे साहेब यांनी मांडली, 100% लसीकरण करणारे गाव म्हणून कुंभारे साहेबांनी गावातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मंडळीचे कौतुक केले..शेवटी अध्यक्षीय भाषण संपतजी खलाटे उपविभागीय अधिकारी यांनी केले व कार्यक्रमाचा शेवट झाला..*
*या प्रसंगी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन विषय शिक्षक सुधीर भाऊराव झाडे, यांनी केले तर आभार सहा. शिक्षक मारोती चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहा. शिक्षक श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, गजानन कुळमेथे, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके, तसेच गावातील आनंदराव मडपती, रमेश कोडापे, सुरेश आळे, वसंत सोयाम, माधव कुमरे, शरद पुसाम, किसन कोडापे, लालशाव आत्राम, विनोद आत्राम, भारत कोडापे, भाऊजी मेश्राम, मोहपत कुळमेथे, वसंत मेश्राम, बापुजी पेंदोर, रवी कुळसंगे, सुरेश येमुलवार तथा ग्रा.पं. कर्मचारी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, डाटाएन्टी ऑपरेटर बालाजी मुंडे, रोजगार सेवक दिनेश राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले.*