नागभीड येथे आपचा कार्यकरता मेळावा संपन्न, आप मध्ये अनेक युवकांचा प्रवेश

श्री प्रदीप मनोहर खापर्डे

कान्पा ग्रामीण प्रतिनिधी

मो. न.8329084432

कान्पा – नागभीड येथे सध्याच्या राजकीय आढावा घेत असता. सर्वसामान्य जनता ही आम आदमी पार्टी कडे खूप अपेक्षाने पाहत असून त्याच्या अपेक्षा खूप उचावल्या आहेत. त्यामुळे आप च्या स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली व पंजाब सरकारच्या कार्यक्षम ते मुळे सर्वसामान्याच्या आयुष्यात खरा बदल हा फक्त आम आदमी पार्टी करू शकते. असा लोकांचा ठाम विश्वास आहे. म्हणून लोकांसमोर आप हाच भविष्यात योग्य पर्याय आहेत. े असे विचार आप चे चिमूर विधानसभा संयोजक श्री प्राध्यापक डॉक्टर अजय पिसे यांनी नागभीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

नागभीड येथे आम आदमी पार्टीच्या तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात नागभीड तालुक्यातील अनेक युवकांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व स्वयंसेवकाच्या उपस्थित श्री योगेश सोनकुसरे, प्रमोद भोयर, दिगंबर कांकवार अक्षय उईके, मुकेश मशरा म, मंगेश आबले, अंकित पोतरजवार, कुणाल धानोरकर, संदीप गायकवाड, विक्की मेश्राम, यांच्यासह एकूण तीस जणांनि आप च्या विचारधारेला अंगीकारून आप मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आप चे जेष्ट नेते श्री सुरेशजी कोल्हे, श्री नानक नाकाडे, व आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉक्टर अजय पिसे उपस्थित होते. याप्रसंगी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्ते सोबत संवाद साधून त्यांच्या भागातील समस्या जाणून घेतल्या आगामी निवडणुकीत संदर्भात आराखडा तयार करून कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here