रिद्धपूर ते जालनापूर डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट, भ्रष्टाचाराच्या चौकशीची गावकऱ्यांची मागणी,खासदार राणा यांच्या पत्राला केराचि टोपली
हर्षल राजेंद्र पाटिल
मोर्शी तालुका प्रतिनिधी
मो: 8600650598
चांदुर बाजार ( जालनापूर ) : – रिद्धपूर ते जालनापूर या डांबरीकरण रस्त्याचे काम संबधित ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, परिणामी नव्याने झालेल्या रस्ताचे डांबर जागोजागी उखडत असल्याने, सदर कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जालनापूर येथील ग्रामपंचायत सदस्य भूषण निमकर व गावकऱ्यांनी केला असून , सदर रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबच जिल्हाधिकारी आणि खासदार नवनीत राणा यांच्या कडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
रस्ताच्या कामाची गुणवत्ता पाहता संबधित ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियलचा वापर रस्ताच्या कामात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रस्ताचे काम सुरू असतांना निकृष्ट कामाची महिती संभदित अभियंताना गावकऱ्यांनी दिली .
परंतु अभियंता यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. परिणामी दीड महिन्यातच् रस्ताची वाट लागली आहे. रस्तामुळे शाळकरी मुलांकरिता सुरू झालेली बससेवा बंद झाली आहे.आहे.त्यामुळे शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता रस्ताच्या कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातुन दिला.