जोगेश्वरीतील जयजवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकाची यशस्वी ९ थरांची विजयी सलामी
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई
मो. नं. ८१४९७३४३८५
जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील ‘जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक ‘ हे ‘उपनगरचा राजा’ म्हणून ओळखले जाणारे गोविंदा पथक आहे. या गोविंदा पथकने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी ८ थर रचून श्रावणारंभ साजरा केला. आणि ९ ऑगस्ट २०२२ रोजी कडक ९ थर रचून जोगेश्वरीकरांच्या नावलौकिकात अजून भर दिली. गुरुवारी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांनी जय जवान गोविंदा पथकास भेट दिली. त्यांचे स्वागत बालगोपाळांनी अतिशय जल्लोष्यात केले.
View this post on Instagram
जय जवानच्या गोविंदा पथकाने मनसे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव यांना कडक ९ थर रचून आपली कामगिरी दाखविली. जय जवान गोविंदा पथकाच्या कामगिरीचे कौतुक मनसे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले. या मंडळातर्फे दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथक, हनुमान मंदिर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्येंत पोस्ट ऑफिस मधून ३९९ रुपयांत १० लाखांचा अपघाती विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.