मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
प्रवासी आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:12/08/2022
कोलाड: मुंबई गोवा महामार्गा ची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी भरमसाढ खड्डे परले आहेत, पावसाळा सुरु आसुन गणेशोत्सवा च्या सुरवातीलाच महामार्गाची दुरावस्था चा विषय चर्चेत येतो, गल्ली पासुन दिल्ली पर्यंत महामार्गा च्या परिस्थितीची चर्चा रंगते. पहाणी दौरे आणि आढावा बैठका होतात. धातुर मातुर दुरुस्ती केली जाते,मात्र पुन्हा पाउस आला की चेहर्यावर चा मेकप उतरावा तशी परिस्थिती महामार्गा ची होते.खड्ड्यातुन आदळत आपटत वाट काढत कोकण वासियांचा प्रवास सुरुच रहातो, गेली अनेक र्वष थोड्याफार फरकाने हिच परिस्थिती कायम आहे. पळसपे ते इंदापूर महामार्गा च्या चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरु झाले ,हे काम 2014 मध्ये पुर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र 2022 चाउत्तरार्थ सुरु झाला तरी काम पुर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही, गडबड ते इंदापूर दरम्यान महामार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे, त्या मुळे वाहनचालकांना गाड्या चालवतांना तारेवरील कसरत करावी लागते.
रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती साठी खडी आणि मातीचा वापर केला जात आहे, या मुळे चिखलाचे ही साम्राज्य आहे. महत्वाचीगोष्ट म्हणजे या खड्ड्या मुळे आपघातांचे प्रमाण ही वाढले आहे. महामार्गाची तातडीने दुरुस्ती करुन रखडलेली कामे मार्गी लावणे आशी मागणी होत आहे.
महामार्गा ची परिस्थिती खुपच भयानक आहे.
खड्डया मुळे महामार्गावर गाड्या चालवणे कठीण आहे.
वाहतूकीचा वेग ही मंदावलेली आहे.
रस्त्या ची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आसलेने मा.नितीन जी गडकरी साहेबांनी लक्ष देणे बाबत ची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.