हर घर तिरंगाअभियान अंतर्गत मेडशी येथे भव्य रॅली,
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम: – स्वतंत्रला 75 वर्ष पूर्ण झाल्या च्या निमित्त मेडशी येथेआजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम वर्षभर शाळा स्तरावर व देश पातळीवर साजरा करण्यात येत आहे त्यानुसार आज हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत मेडशी येथे जनजागृती करण्यासाठी नागनाथ माध्यमिक विद्यालय, विश्वभारती माध्यमिक आश्रम शाळा, जिल्हा परिषद
शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा ,या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी भव्य रॅलीचे आयोजन केले होते यावेळी मेडशी ग्रामपंचायत ने सहभाग घेतला होता संपूर्ण देश पातळीवर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार दिनांक 13, 14, 15 ,ऑगस्ट या तीन दिवशी शासकीय कार्यालयात तसेच प्रत्येक घरात भारताचा झेंडा फडकविण्यात येणार आहे शासनाच्या आदेशानुसार मेडशी येथे भव्य रॅली काढण्यात आली आहे रॅली ची सुरुवात मेडशी ग्रामपंचायत येथून दहीहंडी चौक ,गांधी चौक ,आदिवासी वेटाळ ,शिवनेरी चौक, नेताजी चौक ,मार्गे पुन्हा मुख्य रस्त्याने शाळा शाळेमध्ये आणण्यात आली त्यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन घरोघरी झेंडे लावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले यावेळी मेडशीचे सरपंच ,ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले✍