एकल अभियान आलापल्ली अंतर्गत तुमरगुंडा येथे रक्षाबंधन उत्सव साजरा
महेश बुरमवार
ता.प्रतिनिधी मुलचेरा/ महेश बुरमवार
मो.न.9579059379
दि. 11-08-2022 रोजी एकल अभियान आलापल्ली अंतर्गत एकल विद्यालय ग्राम तुमरगुंडा यांचा वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आले व स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. एकल विद्यालयातील सर्व मुलं मुली एकत्र येऊन एकमेकांना राखी बांधले , उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, याप्रसंगी एकल विद्यालयातील आचार्य, ग्रामकोष समिती अध्यक्ष तुमरगुंडा श्री. दिलीप शेडमाके, अंगणवाडी सेविका सुवर्णा शेडमाके व विद्यार्थी उपस्थित होते.