सातगाव आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा सण साजरा

52

सातगाव आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा सण साजरा

ईसा तडवी

मिडिया वार्ता न्युज

पाचोरा तालुका प्रतिनिधी

मो. 9860884602

पाचोरा प्रतिनिधी :- येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता सुभाष पाटील, तर पोलीस पाटील दत्तू पाटील, गजानन लाधे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बहिणीची व भावाची आठवण येऊ नये. यासाठी सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील, राहुल, अधीक्षका शुभांगी पाटील यांनी कार्यक्रम आयोजित करुन, “बहिण भावाचं पवित्र नातं” याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षक डी.आर.पाटील, सुनील बच्छे, फिरोज खाटीक, संदेश पवार, सागर पाटील, शुभांगी पाटील, ओमप्रकाश शेंडे, कमरुद्धीन तडवी, सखाराम चव्हाण, सखुबाई तडवी, सदाबाई तडवी, माधुरीबाई अलाट आदी उपस्थित होते.