कालकाई माता क्रीडा सामाजिक संस्था कोतवाल बु वतीने मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटप व गावफलक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे# आमदार श्री प्रवीण दरेकर
सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बु गावामध्ये कालकाईमाता क्रीडा सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना व माध्यमिक शाळांतील २० खेळाडूंना एकूण १७७७ मोफत स्पोर्ट्स गणवेश वितरित करण्यात आले. यासोबतच, पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांची ओळख मुंबई, बोरिवलीसह अन्य ठिकाणी जाणा-या एसटी बसवरून होण्यासाठी प्रत्येक गावाचे फलक पोलादपूर एसटी डेपो व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कालकाईमाता क्रीडा सामाजिक संस्था चे संस्थापक पोलादपूर चे भूमिपुत्र विधानसभा गटनेते व आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर यांची उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत कार्यरत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्या योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पोलादपूरच्या गतवैभव प्राप्तीसाठी जे काही करावे लागेल ते आपण निश्चित करू.”
कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये भाजपा उपजिल्हाध्यक्ष श्री बिपीन महामुनकर, प्रसन्न पालांडे, महेश शिंदे अनिल मोरे,तालुका अध्यक्ष वैभव चांदे, मागाठाणे महामंत्री कृष्णकांत दरेकर, शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, उद्योजक रामदास कळंबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर, गोविंद चोरगे, राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश सुर्वे, सरपंच रेखा दळवी , गटविकास अधिकारी सौ. दीप्ती गाट, अनिल मोरे दशरथ उतेकर शिक्षक नेते सोपान चांदे, विशाखा समिती अध्यक्ष प्राजक्ता मोरे ,सूरवसे सर, दत्तात्रेय उतेकर , परशुराम दरेकर, सरपंच अविनाश शिंदे, जमीर धामणकर, तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ आशिष दरेकर गणेश कदम राजेश कदम सचिन दरेकर श्रीधर जाधव परशुराम दरेकर विजय दरेकर गिरिधर दरेकर समीर दरेकर संतोष सकपाळ संदेश सकपाळ सुयोग दरेकर मंगेश जाधव ऋतिक कुटेकर अमर कदम आशुतोष दरेकर गजानन पार्टे सुरज पार्टे समावेश होता.
तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकवृंद व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिस्तबद्ध आयोजन, उत्साही वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. कालकाई माता क्रीडा सामाजिक संस्था ही केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले…. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले