*अमरावती रिपाई आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा*

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी राजीनाम्याच स्पष्टीकरण दिलंय. माघिल अनेक दिवसापासुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यावर होते ते नाराज

अमरावती:- मि मागील 35 ते 37 वर्षापासून पैंथर ते रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे. मात्र भाजपा सोबत गेल्या पासून आपली पक्षाची भूमिका ही केवळ मोदी धार्जीनी झाल्याची भावना अलीकडच्या काळात घडणारया घटना वरुन दिसून येते.
अन्याय अत्याचारा विरुद्ध लढणारी संघटना म्हणून या संघटनेत कार्यकर्ता झालो. या संघटनेने मला स्थानिक पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली.
याबाबत आपले आभार व्यक्त करतो. परन्तु अलिकडच्या कालात पक्षाची भूमिका विशेषत: पक्ष नेतृत्वाची भूमिका मोदींचा उदोउदो करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. आणि समाजाचे जे कळीचे प्रश्न आहेत उदा. शिष्यवृत्ति, खासगी करण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
आज राफेल वायुसेनेतदाखल होत असताना सर्वधसर्म समभाव प्रार्थना घेतली. त्यात हिन्दू , मुस्लिम ,शिख ईसाई या चार धर्माच्या प्रार्थना झाल्या .त्यात केवळ बौद्ध धर्माची प्रार्थना नव्हती. हीच का भाजपाची सर्वधर्म प्रार्थना?
पक्ष ज्या सत्तेत असताना एक एक पब्लिक सेक्टर यूनिट बंद होताना पक्ष भूमिका घेत नाही आणि ज्या विदुषिने आरक्षणाला विरोध केला तिला पाठिंबा दिला एवढेच नाही तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच केंद्रीय नेते असताना आपण स्वतःहून तिच्या घरी जाता हे मला न पटनारे आहे.
तुम्ही आमचे संघर्ष शील नेते म्हणून आपली नेतृत्वाची रया या निमित्ताने घालवली म्हणून मि अमरावती जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. अस पत्रात प्रदीप पंजाबराव दंदे यांनी लिहत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना पाठवलेल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here