*प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने समस्या निवारण केंद्राची सुरवात*
*विदर्भ प्रमुख (पूर्व विभाग) रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे चा नेतृत्वात समस्या (तक्रार) निवारण केंद्राची सुरवात*
*सिंदी रेल्वे:- प्रशांत जगताप:-* येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विदर्भ प्रमुख (पूर्व विभाग) रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे चा नेतृत्वात जनतेच्या विविध समस्या (तक्रार) निवारण केंद्राची माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतुन हिंगणघाट/ समुद्रपूर/ सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सिंधी रेल्वे या शहरात आज ११ सप्टेंबर 2020 पासून बस स्टॉप जवळ मोकळ्या जागेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या विविध समस्या निवारण केंद्राची सुरवात करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख जयंत भाऊ तिजारे प्रामुख्याने उपस्थित होते. या समस्या निवारण केंद्रात आज पहिल्याच दिवशी 20 तक्रारीचे निवारण करण्यात आले. रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या हिंगणघाट येथील यशस्वी तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून दि.11/09/2020 शुक्रवार ला दर पंढरवाडी (महिन्यातील दुसरा व चौथा गुरुवार)ला सिंदी (रेल्वे) येथे समस्या (तक्रार) निवारण करण्यात येईल, शेतकरी शेतमजूर कामगार व इतर तक्रारी, धडक सिंचन विहीर प्रलंबित अनुदान, पांदन रस्ते, घरकुल समस्या व सनद समस्या व इतर समस्या लेखी स्वरूपाचे स्वीकारून त्यावर संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे वरील समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे सांगण्यात आले या समस्या (तक्रार)निवारण केंद्राचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मंगल सोनटक्के, सेलू तालुका प्रमुख हंसराज बेलखोडे व शहर प्रमुख सुरज आष्टनकर यांनी केले.
यावेळी समस्या (तक्रार) निवारण केंद्रामध्ये उपस्थिती, शुभम गोल्हर, अभिषेक बडवाईक, शुभम सुरकार, कैलास उईके, मनोजराव साटोने,चतेजस सोनटक्के, वैभव मुंडले, प्रकाश तिमांडे, चकिशोर वडांद्रे व तक्रारदार व शहरातील नागरिक उपस्थित होते.