*यवतमाळ उमरखेडच्या ठाणेदारा विरुद्ध अट्रॉसिटी च्या गुन्हा नोंदवा.*

*रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाअध्यक्षाची पत्रकार परिषदेत मागणी*

*यवतमाळ/उमरखेड प्रशांत जगताप विदर्भ बिरो चीफ:-* देशातील सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनमध्ये येना-या नागरिकांबरोबर सौजन्याने वागावे लागते. मात्र, पिरंंजीतिल कार्यकर्त्यांच्या प्रकरणाबाबत पुलिस प्रशासनासी विचारणा केली असता, उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदारासह उपनिरिक्षक आणी पोलिस कर्मचा-यांनी अश्लील शिवागाळ करुन धक्काबुक्की केली. त्यामुळे ठाणेदारांसह संबंधित कर्मचा-यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाअध्यक्ष तातेराव हनवते यांनी पत्रकार परिषदेत केली.
विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उमरखेडच्या पोलिस कर्मचा-यांच्या असभ्य वर्तनावर अनेक आरोप केले. 8 सप्टेंबरला आपण पिरंजीतील कार्यकर्त्यांला खोट्या आरोपाखाली अटक केल्याने या प्रकरणाची विचारणा करण्याकरिता पोलिस स्टेशनला गेलो होतो. मात्र, त्याठिकाणी आपल्या बरोबर पोलिस उपनिरीक्षक पांचाळ व पोलिस कर्मचारी रुपेश चव्हाण यांनी येण्याचे कारण विचारले. त्यावेळी ठाणेदारांना भेटायचे आहे, अस सांगितलं. यावेळी उपनिरीक्षक पांंचाळसह पोलिस कर्मचा-यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप हनवते यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली पोलिस सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाणेदार मोतीराम बोडखे, उपनिरीक्षक पांचाळ व रुपेश चव्हाण यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
सात दिवसाच्या आत संबंधितांवर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला. यावेळी कैलाश पवार, करण भरणे, अरविंद धोगडे, गौतम नवसागरे, रणजित काळबांंडे, विनोद गाडगे, प्रकाश वाहुळे, गजानन धोगडे, सिद्धांर्थ दिवेकर, देवानंद पाईकराव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here