अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा लागू केल्याबद्दल* *भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पञाद्वारे मानले आयुक्तांचे आभार*

47

*अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा लागू केल्याबद्दल*

*भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पञाद्वारे मानले आयुक्तांचे आभार*

अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा लागू केल्याबद्दल* *भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पञाद्वारे मानले आयुक्तांचे आभार*
अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा लागू केल्याबद्दल*
*भाजयुमो महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी पञाद्वारे मानले आयुक्तांचे आभार*

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर ,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे चंद्रपूर श्री महेश कोलावॉर यांनी
अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना टीईटी परीक्षा लागू केल्याबद्दल भाजयुमो चंद्रपूर महानगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे पञाद्वारे आभार मानले आहे.

परीक्षा परिषदेकडे पाठविलेल्या पञातून कोलावार यांनी म्हणाले की,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचेतर्फे दरवर्षी डी.एड,(पदविका) आणि बी.एड (पदवी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची टीईटी परीक्षा घेतली जाते.

महाराष्ट्रात सन २०११ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेक विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहेत.त्यात २०१७ पासून पविञ पोर्टलच्या माध्यमातून सुरु झालेली भरती प्रकिया मध्यंतरीच थांबली आहे.शासनाच्या वतीने मागील दोन वर्षापासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

नुकताच शालेय शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा घेण्याची घोषणा करुन ५ सप्टेंबर पर्यंत व समोर मुदत वाढवून ७ सप्टेंबर पर्यंत आवेदन अर्ज मागविले आहे.या परीक्षेला केवळ पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीच पाञ असून,शिक्षक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पाञता परीक्षा देण्यापासून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दूर ठेवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे स्वर व्यक्त केली जात होती.

दरम्यान शालेय शिक्षण विभागाने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,आता डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला असणा-या विद्यार्थांना टीईटी परीक्षा देण्याची संधी दिली आहे.ही बाब विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अाहे.
या निर्णयामुळे विद्यार्थांना दोन वर्ष वाट पहावी लागणार नाही.शालेय शिक्षण विभाग व म.रा.प.प.विभागानी विद्यार्थांचे हित लक्षात घेऊन महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल महेश कोलावार यांनी पञाद्वारे आभार मानले आहे.