अत्यंत निर्दयी अशी घटना पोटच्या मुलांनीच केला वडिलांचा खून

48

अत्यंत निर्दयी अशी घटना पोटच्या मुलांनीच केला वडिलांचा खून

अत्यंत निर्दयी अशी घटना पोटच्या मुलांनीच केला वडिलांचा खून
अत्यंत निर्दयी अशी घटना पोटच्या मुलांनीच केला वडिलांचा खून

मीडिया वार्ता न्यूज
     जळगाव जिल्हा प्रतिनिधी
          विशाल सुरवाडे

जळगाव -12 सप्टेंबर-शहरातील निमखेडी शिवारात दवाखान्यात जाण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पोटच्या मुलांनी वडिलांचा खून केल्याची घटना आज घडली.
प्रेमसिंग अभिसींग राठोड (वय ५०) हे निमखेडी शिवारात कांताई नेत्रालयाच्या परिसरात पत्नी, दोन मुले, दोन मुली यांच्यासह रहात होते. ते काही दिवसांपासून आजारी असल्याने आज सकाळी त्यांना त्यांची मुले दीपक आणि गोपाळ यांनी दवाखान्यात जाण्याचे सांगितले. मात्र प्रेमसिंग यांनी याला नकार दिला. यावर घरात मोठा वाद झाला.
या वादातूनच प्रेमसिंग यांनी चाकू उगारून आपल्या मुलांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत दोन्ही मुलांनी त्यांचा चाकूने वडिलांवर वार करून त्यांना जीवे मारले. काही क्षणांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी दोघे मुलांना घेतले ताब्यात
दरम्यान, तालुका पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपक आणि गोपाळ या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. तर घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली.