सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगांवच्या वतीने अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

60

सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगांवच्या वतीने अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

अंधश्रद्धा टाळा बॅनर लावून करत आहेत जणजागृती

सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगांवच्या वतीने अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर
सार्वजनिक बाल गणेश मंडळ डोंगरगांवच्या वतीने अंधश्रध्दा टाळा, गणेश मंडळात झळकले बॅनर

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती आणि नागभीड तालुक्यात जादुटोणा केल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण झाली. या घटनांनी जिल्हा हादरला. जिल्ह्यात अंधश्रध्दा वाढीस लागली. मानवी मेंदूत भिनलेली अंधश्रध्दा दूर करण्यासाठी गणेश मंडळे आता पुढे सरसावली आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याची माहिती देणारे बॅनर गणेश मंडळांनी लावले. कार्टून चित्राचा वापर करीत तयार केलेले बॅनर भक्ताचे लक्ष वेधत आहेत.

समस्त चंद्रपूर जिल्ह्यातील घरोघरी श्री गणेश चतुर्थी निम्मित श्री गणपती बाप्पा स्थापना करण्यात आली त्यात नागभीड तालुक्यातही उत्साहवर्धक हर्षोल्हासात श्री गणेशाचे शुभ आगमन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादुटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाणीचा प्रकार पुढे आला. या प्रकाराने पुरोगामी महाराष्ट्र हादरला. हे प्रकरण ताजे असतानाच नागभीड तालुक्यात जादूटोणा केल्याचा संशय घेत मारहाण झाली. एकविसाव्या शतकातही मानवी मेंदूत अंधश्रध्दा भिनली असल्याचा प्रत्यय या दोन घटनांनी दिला. ग्रामीण,शहरी भागात बुवाबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सन 2013 मध्ये शासनाने अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अमलात आणला.मात्र या कायद्याची माहिती नसल्याने बुवाबाजीचा नादी सर्वसामान्य माणूस लागत आहे. अशात धाबा उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यातील कलमाची माहिती देणारे बॅनर झळकविले आहेत.